१०आणि ११ डिसेंबरला घनसावंगी येथे मसापचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन
जालना -“मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन” घनसावंगी येथे दिनांक १० आणि ११ डिसेंबर रोजी पार पडत आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे ,तर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक शेषराव मोहिते यांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान उद्घाटनाला मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार ,यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल ,आमदार संतोष दानवे ,आदींची उपस्थिती राहणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या भरगच्च कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांच्या साहित्याची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणार आहे .साहित्य संमेलनाविषयी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागडचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी आज ही माहिती दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर आणि ए. जे. बोराडे यांची उपस्थिती होती.
साहित्याचे हे प्रदर्शन भरवण्यासाठी संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,घनसावंगी येथे “महदंबा साहित्य नगरी” सजायला लागली आहे.*असे आहेत कार्यक्रम*
शनिवार दिनांक 10 डिसेंबर सकाळी साडे आठ ते दहा ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन .साडेदहा ते दीड उद्घाटन. दीड ते अडीच प्राचार्य नागनाथ पाटील वसमत नगर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन, त्याचवेळी दुसऱ्या सभागृहात छाया महाजन यांच्या अध्यक्षतेखाली “नवलेखांचे लेखन समाज माध्यमांच्या आवर्तात अडकले आहे !” या विषयावर परिसंवाद. तिसऱ्या सभागृहात जगदीश कदम नांदेड, यांच्या अध्यक्षतेखाली” मी का लिहितो/लिहिते” याविषयी परिसंवाद. सायंकाळी पावणे पाच ते सात वाजे दरम्यान फ.म.शाहजींदे यांच्या अध्यक्षतेखाली “कृषी जीवनातील प्रक्षोभ आणि मराठी लेखक” या विषयावर परिसंवाद .याच वेळी बा.भो. शास्त्री करमाड यांचे अध्यक्षतेखाली” संत साहित्याची उपेक्षा समाज चारित्र्यासाठी हानिकारक आहे!” या विषयावर परिसंवाद आणि याच वेळी दुसऱ्या सभागृहामध्ये राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली “आमचे कवी आमची कविता” हाकार्यक्रम. राज रणधीर आणि सुहास पोद्दार हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. सायंकाळी सातच्या नंतर पुन्हा एक कवी संमेलन रंगणार आहे आणि याचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक जयराम खेडेकर हे रंग भरणार आहेत.याचे सूत्रसंचालन नांदेड येथील देविदास फुलारी आणि औरंगाबाद येथील समाधान इंगळे हे करणार आहेत.
****
*रविवार दिनांक 11* सकाळी साडेनऊ ते साडे अकरा ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल यांची मुलाखत घेतील पृथ्वीराज तौर ऋषिकेश देशमुख आणि यशवंत सोनूने, साडेनऊ ते साडेदहा बाल मेळावा आयोजित करण्यात आला आहे ,आणि याचे उद्घाटन इंद्रजीत भालेराव हे करणार आहेत. साडेदहा ते एक वाजेपर्यंत बाल-कुमार लेखकांशी गप्पा साधला जाणार आहे. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार लेखक गप्पा मारणार आहेत .साडेअकरा ते दोन वाजे दरम्यान कवी दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. याचे सूत्रसंचालन केशव खटिंग हे करणार आहेत. पाचव्या परिसंवादात सकाळी साडेअकरा ते दोन वाजे दरम्यान प्रवीण बर्दापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली “वर्तमान स्थितीत प्रसार माध्यमांकडून अपेक्षा” याविषयी प्रसार माध्यमातील मान्यवरांचा परिसंवाद पार पडणार आहे. दुपारी एक ते तीन वाजेच्या दरम्यान बाल-कुमार कथाकथन सावित्री जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणि शेवटचा परिसंवाद दुपारी दोन ते पाच या दरम्यान ” मराठवाड्यातील राजकीय चित्र: दशा आणि दिशा!” या विषयावर होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून आमदार अशोकराव चव्हाण, यांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये राजकीय मंडळी व विरोधी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, पंकजा मुंडे,आ. राजेश टोपे,आ. जयदत्त क्षीरसागर हे सहभागी होणार आहेत. तीन ते पाच वाजे दरम्यान आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बाल-कुमार कवी संमेलन होणार आहे.
समारोप सोहळा सायंकाळी पाच वाजता रंगणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष शेषराव मोहिते हे भूषविणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती राहणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com