Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

फक्त 500 रुपयात डायलिसिस; जैन श्रावक संघाचे आरोग्य सेवेत पदार्पण

जालना -किडनी निकामी झाल्यानंतर डायलिसिस हा उपचार सुरू होतो आणि तो एकदा सुरू झाल्यानंतर आयुष्याचा शेवट झाल्यावरच तो थांबतो. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या गरजेनुसार चार दिवसाला आठ दिवसाला पंधरा दिवसाला अशा वेगवेगळ्या फरकाने शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी हा उपचार घ्यावा लागतो. सरासरी एका वेळेला चार ते सात हजार रुपये खर्च येतो. आधीच आजारी असलेला रुग्ण या खर्चाच्या भीतीने अधिकच खचून जातो त्यामुळे त्याला जीवन नकोसे होते .अशा परिस्थितीमध्ये रुग्णाने खचून न जाता त्याच्या आवाक्यात असणारा खर्च करून हा उपचार घेता यावा म्हणून श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने गुरु गणेश डायलिसिस सेंटर सुरू केले आहे. आणि अवघ्या पाचशे रुपयांमध्ये रुग्णाला ही डायलिसिसची सेवा मिळणार आहे.

शैक्षणिक संस्था, गोसेवा या क्षेत्रानंतर या संघाने आता आरोग्य क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना इथे उपचार घेऊन आपले आयुष्य वाढवता येईल. या डायलिसिस सेंटर चे उद्घाटन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेशकुमार सकलेच्या यांच्या हस्ते सोमवार दि.5 ला पार पडले .यावेळी सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांचीही प्रमुख उपस्थिती होती.उद्घाटनापूर्वी गौतममुनिजी म. सा. यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना आशीर्वादाचे मार्गदर्शन केले.

 

या प्रकल्पाबद्दल माहिती देताना संघाचे सचिव डॉ. धरमचंद गादिया यांनी या उपक्रमाचा उद्देश विशद केला आणि भविष्यात हा प्रकल्प कशा पद्धतीने राबविला जाणार आहे याविषयी देखील माहिती दिली .भविष्यातील प्रकल्पाच्या खर्चाची तरतूद करताना त्यांनी सांगितले की समाजातील दानशूर व्यक्तींना केवळ 1हजार एकशे रुपये देणगी देण्याचे आवाहन केले होते आणि याला प्रचंड प्रतिसाद मिळाला .या आवाहनानुसार जैन श्रावक संघाकडे 1400 दात्यांनी नोंदणी केले आहे, त्यानुसार 15 लाख 40 हजार रुपये सध्या श्रावक संघाकडे जमा झालेले आहेत ,आणि देणगीचा ओघ अजूनही सुरूच आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता किंवा अडचण येऊ नये या उद्देशाने सर्व तयारी केली आहे.

* श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाची कार्यकारिणी*
सुदेश कुमार सकलेचा अध्यक्ष ,भरत कुमार गादिया उपाध्यक्ष ,डॉ. धरमचंद गादीया सचिव, कचरूलाल कुंकूलोळ सहसचिव, संजय कुमार लुनावत कोषाध्यक्ष, तर विश्वस्तांमध्ये गौतमचंद रुणवाल, संजयकुमार मुथा, नेहमीचंद रुणवाल, संजय बंब ,शांतीलाल संचेती, प्रकाशचंद सुराणा, यांचा समावेश आहे.*******

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button