Jalna Districtजालना जिल्हा

स्वतः सप्तपदीच्या बंधनात अडकलेल्या अधिकाऱ्याने वऱ्हाडी मंडळींनाही दिली ही शपथ!

जालना -आपण एखाद्या प्रकरणात अडकल्यानंतर दुसऱ्याला कंस अडकवायचं😂😂 हे सरकारी अधिकाऱ्यांना चांगलंच कळतं! असंच हे एक प्रकरण आहे लग्न सोहळ्याचं! अक्षदा डोक्यावर पडल्यानंतर त्यांना आठवली आपली कर्तव्यनिष्ठा, आणि सर्वच वऱ्हाडी मंडळींना त्यांनी चक्क शपथ दिली हो!

त्याचं झालं असं की जालना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन निरीक्षक असलेले बंकट रिळे यांचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा या गावाच्या रहिवासी डॉ. अभिलाषा पुरेकर यांच्यासोबत चार डिसेंबर रोजी दुपारी पार पडला. सप्तपदीच्या फेऱ्यामध्ये अभिजीत रिळे स्वतः अडकले ,आणि त्यानंतर आठवले ते त्यांना आपले कर्तव्य. नेहमीच दुसऱ्यांना रस्ते सुरक्षिततेच्या शपथा देणाऱ्या रिळे यांना ही सुवर्णसंधी आठवली आणि आप्तस्वकीयांसोबत वधू पक्षालाही त्यांनी शपथ घ्यायला लावली. शासकीय कार्यालयांमध्ये ज्याप्रमाणे शपथ देणाऱ्याच्या पाठीमागे शपथ म्हणतात तशा पद्धतीने, जागेवर उभा राहून आणि छातीसमोर हात धरून त्यांनी सर्वांनाच “रस्ते सुरक्षिततेची शपथ दिली” अन्य वेळी अशा शब्दांना जनता बगल देऊन जाते , इथे मात्र वर पक्षाने आणि तेही स्वतः नवरदेवाने सर्वांनाच शपथ दिली आहे. नवरदेवाची ही कर्तव्यनिष्ठा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय होत आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button