लेखी आश्वासनानंतर अतिक्रमणधारकांचे उपोषण मागे
जालना -भोकरदन तालुक्यातील मोजे जवखेडा ठोंबरे येथील गट क्रमांक 168 मध्ये असलेल्या गायरान जमिनीवरील केलेले अतिक्रमण नियमानुसार करावे, या मागणीसाठी अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 28 नोव्हेंबर पासून उपोषण सुरू केले होते.
दरम्यान शासनाच्या वतीने ही अतिक्रमणे नियमानुसार करण्यासाठी महसूल विभागाच्या उपसचिवांना कळविण्यात आल्याचे लेखी आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी उपोषणकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे फकीरा फकीरा वाघ यांचे नेतृत्वाखाली सुरू असलेले हे उपोषण दिनांक सात डिसेंबर रोजी मागे घेण्यात आले आहे. 1982 पासून ताब्यात असलेल्या असलेल्या जमिनी अजूनही अतिक्रमण धारकाच्या नावावर केल्या गेल्या नाहीत, त्यामुळे या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत ,या जमिनीचा सातबारा अतिक्रमण धारकांच्या नावावर करावा या, आणि अन्य मागण्या संदर्भात गेल्या 30 वर्षांपासून हे अतिक्रमण धारक लढा देत आहेत. मात्र अद्याप पर्यंत त्यांना यश मिळाल्यामुळे शेवटी फकीरा वाघ यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण धारकांनी हे उपोषण सुरू केले होते. या उपोषणामध्ये मंदाबाई आप्पा साठे, मीराबाई सुखदेव गायकवाड, संगीता भास्कर साठे, पूर्णबाई जगन साठे, रुखमन गुलाब गायकवाड, आदी अतिक्रमणधारकांचा समावेश होता.**
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com