शिक्षणात संवेदनशीलता असावी ;उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर
जालना -विद्यार्थ्यांना शाळेत मिळणारे शिक्षण हे केवळ औपचारिकता न राहता त्यामध्ये संवेदनशीलता असावी असे प्रतिपादन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली धानोरकर यांनी केले.”100 शिक्षक क्लब ऑफ जालनाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार वितरण समारंभ 2022″ मध्ये त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेच्या 14 खाजगी संस्थांच्या 14 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून तर पाच शाळांना आदर्श शाळा पुरस्काराचे वितरण अंजली धानोरकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील जे.ई.एस. महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती सुनीलभाई रायठा ,शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतीश सातव, माध्यमिक शिक्षणाधिकारी जालना श्रीमती मंगल धूपे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, सेवानिवृत्त औषध निर्माता डॉ. दत्तात्रय गाडेकर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमती धानोरकर म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त प्राधान्य हे शिक्षणाला दिल्या जात आहे आणि ते योग्य देखील आहे, परंतु याचवेळी दुसऱ्या बाजूने पाहिले तर शिक्षण ही केवळ औपचारिक औपचारिकता होत आहे. त्यामध्ये संवेदनशीलता नाही. शिक्षकांनी जीव ओतून त्यामध्ये जिवंतपणा आणावा जेणेकरून विद्यार्थी शिक्षणाकडे अधिक आकर्षित होतील आणि खेळीमेळीच्या वातावरणात ते ज्ञानसंपादन करतील.या कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ मगर, प्रकाश कुंडलकर, कार्याध्यक्ष आर. आर. जोशी डॉ. शिवानंद मेहत्रे आदींनी परिश्रम घेतले.****
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com