भाजपच्या आमदारांनी साहित्य संमेलनाला येण्याचे टाळले?का उद्धव ठाकरेंच्या व्यासपीठावर यायला घाबरले?का केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे यांचे नाव पत्रिकेत नसल्यामुळे बहिष्कार टाकला? समारोपाला शिंदे गटाचे श्री. खोतकर आणि भाजप नेते विलास खरात उपस्थित राहतील का? साहित्य संमेलनातील या चर्चा
घनसावंगी-( महदंबा साहित्य नगरी मधून) मराठवाडा साहित्य परिषदेचे 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन आज दि.10 रोजी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे सुरू झाले. उद्या दिनांक 11 डिसेंबर रोजी सायंकाळी या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तर संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक शेषराव मोहिते यांची उपस्थिती होती.स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड व संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय घनसावंगी यांच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार शिवाजीराव चोथे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते .व्यासपीठ कुठलेही असो राजकीय मंडळींना बोलावल्यानंतर राजकीय विषय निघाला नाही तरच नवल. साहजिकच आजही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली, आणि उद्या दिनांक 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ,” हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या” उद्घाटनासाठी नागपूरला येत आहेत. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र आणि बेळगाव सीमा प्रश्न सोडवावा आणि महाराष्ट्रातील जनतेवर कर्नाटकाच्या होत असलेल्या अत्याचाराला पायबंद घालावा अशी मागणीही केली.
दरम्यान आज उद्घाटनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वपक्षीय नेते निमंत्रित होते. त्यामध्ये भाजपाचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर, भोकरदन चे आमदार संतोष दानवे, आणि बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांचीही नावे होती. मात्र यापैकी एकही आमदार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. त्यामुळे संमेलन झाल्यानंतर इथे कोपऱ्या- कोपऱ्यामध्ये चर्चा रंगाला सुरुवात झाली होती. त्या चर्चेनुसार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन असल्यामुळे त्यांच्यासोबत व्यासपीठावर यायला हे आमदार घाबरले का? का? केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे यांचे पत्रिकेत नाव नसल्यामुळे बहिष्कार टाकला? याविषयी चर्चा सुरू झाली. दरम्यान उद्या सायंकाळी या साहित्य संमेलनाचा समारोप आहे. या समारोपाच्या वेळी शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि भाजपाचे नेते माजी आमदार विलास खरात यांची प्रमुख उपस्थिती मध्ये नावे आहेत. त्यामुळे आज भाजपाच्या आमदारांनी गैरहजेरी लावली असली तरी उद्या हे दोन नेते समारोपाला हजरी लावतील का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत . कदाचित आजच्या उद्घाटन प्रसंगी घनसावंगी तालुका हा लोकसभेसाठी परभणी जिल्ह्यात येतो आणि त्यामुळे परभणीचे खासदार संजय जाधव यांचे पत्रिकेत नावही होते आणि ते उपस्थिती होते मग, भाजपाच्या आमदारांना न येण्याचे कारण काय? याविषयी चर्चेला उधाण आले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com