Jalna Districtजालना जिल्हाराज्य

सेल्फीच्या छंदाने घेतला पंधरा वर्षाच्या अर्णव गिरीचा बळी

जालना-मोबाईल वरून सेल्फी काढण्याच्या छंदामुळे पंधरा वर्षाच्या अर्णव कैलास गिरी या विद्यार्थ्याला आपला जीव गमावा लागला आहे.आज दि 11 ला दुपारी जालना तालुक्यातील खरपुडी शिवारात ही दुर्घटना घडली.

जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील मूळ रहिवासी असलेला अर्णव कैलास गिरी हा पंधरा वर्षाचा विद्यार्थी शिक्षणासाठी जालना शहरात जिल्हा परिषद मुलांच्या शाळेजवळ घर भाड्याने घेऊन राहतो. आज सुट्टी असल्यामुळे अर्णव गिरी आणि त्याचे दोन मित्र आणि दोन मैत्रिणींना घेऊन जालना तालुक्यातीलच खरपुडी शिवारामध्ये फिरण्यासाठी गेले होते. फिरत असताना एका खदानीच्या काठावर उभा राहून अर्णव गिरीने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान त्याचा मोबाईल खदानीमध्ये पडला. हा मोबाईल शोधण्यासाठी अर्णव देखील खदानी मध्ये उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अर्णव पुढे जात राहिला आणि त्याला पोहता ही येत नव्हते, त्यामुळे बराच वेळ तो बाहेर न आल्याने काठावर असलेल्या मित्रांनी अर्डा- ओरड सुरू केली. काही वेळातच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तालुका जालना पोलिसांना कळविले पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्णव चा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह हाताशी लागला आहे. मृतदेहाचे पुढील सोपस्कार पार पाडण्यासाठी सामान्य रुग्णालयात मृतदेह रवाना केला आहे.***

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles