Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

आनंदगडावर “जीवन गौरव पुरस्काराने पं. सुधाकर चव्हाण आज होणार सन्मानित!

प.पू डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र आनंदगड येथे संगीत महोत्सवाचा वेलू लावण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे .तीन दिवसीय या महोत्सवामध्ये रविवारी डॉ. प्रसाद चौधरी, डॉ. सतीशचंद्र प्रभू, ऋषिकांत तौर, यांचे गायन पार पडले.आज दि.12 सोमवारी पुणे येथील गायक “गुरुवर्य पं. सुधाकर चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच मंगळवार दिनांक 13 रोजी गुरुवर्य शिरोमणी पंडित गिरीशजी गोसावी यांचे गायन होणार आहे. दरम्यान पंडित सुधाकर चव्हाण यांना मिळणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारा निमित्त सुधीर दाभाडकर यांनी त्यांच्या जीवनाचा आढावा घेण्याचा केलेला हा विशेष प्रयत्न. सायंकाळी सहा ते आठ वाजे दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कलाश्री संगीत मंडळ, गेल्या २४ वर्षांपासून शास्त्रीय संगीतात निर्व्याज्य सेवा करत आहेत. पं.सुधाकर चव्हाण जे या मंडळाचे प्रमुख आहेत ,ते केवळ शास्त्रीय गायन शिकण्याच्या ध्यासाने, वयाच्या अवघ्या १२/१३ ,वर्षी घरातून निघून आले. कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना, माधुकरी मागुन, आळंदीला राहिले.भजन व अभंग गात.

त्यातूनच त्यांची आवाजाची झेप बघून त्यांना पं सुधाकरराव मराठे,डाॅ.श्रीकांत देशपांडे यांनी कांहीं मेहनताना न घेता शास्त्रीय गायन ,वादन शिकविले. डाॅ.श्रीकांत देशपांडे हे सवाई गंधर्वांचे नातु व पं.भिमसेन जोशी ,यांचे गुरू बंधू होत. त्यामुळे स्वरभास्कर पं.भिमसेन जोशी यांचा सहवास लाभला.ते आज त्यांच्या घराचा एक घटक आहेत. त्यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा म्हणुन कलाश्री संगीत मंडळ स्थापन केले. या द्वारे निरनिराळ्या ठीकाणी आपल्या शिष्या मार्फत वर्ग चालू केले. आजतोपावे ५००-५५० लोकांना, मुला/मुलींना, महिलांना शिक्षण दिले आहे. सर्वांशी आत्मीयतेने वागणे असल्याने, थोड्याच दिवसात नावारुपाला आली आहे.आळंदी ला आठवड्यातुन एक दिवस तेथील गरजू मुलांना विना फी घेता, शिकवितात. ते केवळ माणुसकी या नात्याने. त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दत अनेक सन्मान त्यांना मिळालेले आहेत.संगीत कला विहार या मासिकाच्या संपादकत्वचा मान मिळाला आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button