थंडीत ग्रा.पं.चा प्रचार तापला; प्रचारात महिलांची हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेऊन भावनिक साद
जालना- सध्या थंडीचे दिवस असले तरी ग्रामीण भागातील राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणामुळे गरम होत आहे .आता महिला देखील सकाळच्या प्रचार फेरीमध्ये उतरत आहेत आणि एवढेच नव्हे तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन भावनिक सादही घालत आहेत. त्यांच्या जोडीला सर्वधर्मसमभाव म्हणून की काय गावातील सर्व प्रार्थना घरांसमोर पॅनलच्या पोम्प्लेट चे ठेवून श्रीफळ फोडून देवालाही साकडे घातले जात आहे.
हा आगळावेगळा प्रचार पाहायला मिळाला तो अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे. श्री डोमेश्वर नवतरुण ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने. डोमेगाव हे जेमतेम तीनशे ते साडेतीनशे घरांचे गाव. 1174 मतदार इथे आपला हक्क बजावणार आहेत. एकूण आठ सदस्य ग्रामपंचायत मध्ये निवडून जाणार आहेत, त्यापैकी एक सरपंच आणि उरलेले सात सदस्य हे तीन प्रभागांमधून निवडून जाणार आहेत. पारंपरिक पद्धतीच्या प्रचार फेऱ्याप्रमाणेच आजही प्रचार फेरी निघाली होती. मात्र यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय होती. उमेदवारांनी सर्वधर्मसमभाव जपत मारुती मंदिर, देवी मंदिर, चर्च, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेसमोर पॉम्पलेट ठेवून श्रीफळ फोडले. तर महिलांनी देखील एक दुसरीला साद घालत हळदीकुंकवाचा कार्यक्रम आटोपून घेतला. गावामध्ये आज हा आगळावेगळा प्रचार सुरू होता. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देखील ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात होती आणि यावेळेस देखील ती भाजपाच्या ताब्यात येईल असा विश्वास सरपंच पदाचे उमेदवार संदीप सांगळे यांनी व्यक्त केला आहे.
इतर सात सदस्यांमध्ये कान्हू चोथे ,भाग्यश्री लहामगे ,पार्वताबाई शेळके, रंजना लहामगे, निर्मला चौतमल, धोंडीराम काळे, द्वारका मस्के यांचा समावेश आहे. रविवार दिनांक 18 रोजी मतदान होणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com