Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

“त्या” चारही शिक्षकांवर गुन्हा दाखल करा- शिक्षण उपसंचालक ; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आमच्यावर ही कारवाई- मुख्याध्यापिकेचा पलटवार( शिक्षक विरुद्ध शिक्षण विभाग भाग दोन)

जालना -गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळ गोंदी (तालुका अंबड) यांची जालन्यामध्ये कुचरवटा भागामध्ये अकरम फातेमा माध्यमिक कन्या शाळा आहे . या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीमती द्रोपदी लोखंडे यांच्यासह शाळेतील चार शिक्षक श्रीमती संध्या परसराम पवार ,रावसाहेब पुंडलिक, लटके श्रीमती समीना पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी दिनांक 2 डिसेंबर रोजी दिले आहेत. पंधरा दिवसात हा अहवाल सादर करण्याची ही सुचित केले आहे. निर्णय क्रमांक नऊ मध्ये म्हटले आहे की, “उक्त नमूद अनियमित वैयक्तिक मान्यता आदेश सेवा जेष्ठतेसाठी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला असून स्वार्थासाठी जाणीवपूर्वक खोटे आदेश खरे असल्याची बतावणी करणे, चुकीच्या मान्यता आदेशाआधारे मुख्याध्यापक पद मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, चुकीच्या कामाला सहकार्य करणे ,इत्यादी प्रकरणी संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापक यांच्यावर श्रीमंती मंगल गायकवाड धुपे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद जालना यांनी गुन्हा दाखल करून अनुपालन अहवाल पंधरा दिवसात या कार्यालयास सादर करावा”.

दरम्यान शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराविषयी पण तक्रारी केल्या होत्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांवर हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करून वरिष्ठांची दिशाभूल केली आहे आणि आपल्यावर कारवाई करण्यास भाग पाडले असल्याचा पलटवार या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती द्रोपदी लोखंडे यांनी केला आहे .तसेच दिनांक 22 मार्च 2001 चा जो आदेश रद्द केला आहे त्या आदेशामध्ये 14 कर्मचाऱ्यांची नावे आहेत. असे असताना चारच कर्मचाऱ्यांवर कारवाई कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जर हा आदेश रद्द झाला आहे तर सर्वांवरच कारवाई व्हायला हवी असे त्या म्हणाल्या. दरम्यान या 14 जणांवर जर कारवाई झाली तर शाळेचे संपुष्टच धोक्यात येणार आहे ,आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होण्याची शक्यता आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेच्या तक्रारी आहेत आणि नेहमीच ही संस्था वादाच्या भोवऱ्यात आहे यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वारंवार सुनावण्याही झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सुनावणी नुसार निर्णय क्रमांक एक मध्ये म्हटले आहे की ,उपरोक्त निष्कर्षातील अनुक्रमांक एक ते अठरा मुद्दे विचारात घेता श्रीमती समीना पटेल, सहशिक्षक श्रीमती द्रोपदी लोखंडे ,सहशिक्षक श्रीमती संध्या पवार, सहशिक्षक रावसाहेब पुंडलिक लटके यांचे वैयक्तिक मान्यता आदेश जावक क्रमांक 22- 3- 2001 हे या निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. *काय आहे 22 मार्च 2001 चा आदेश* या आदेशानुसार संबंधित शाळेच्या मान्य पदावर तात्पुरत्या मर्यादित नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण 14 पदे भरण्यात आले आहेत आणि या 14 पदांपैकी या चारच शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. जर हा आदेशच रद्द झाला तर सर्वच पदांच्या मान्यता रद्द करण्यात यायला हव्यात अशी मागणी श्रीमती लोखंडे यांनी केली आहे, तर शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार या सर्वांवरच योग्य ती कारवाई केली जाईल मात्र त्यांची सुनावणी होऊन कारवाई होईल. तूर्तास या चार जणांची सुनावली झाल्यामुळे त्यांच्यावर निर्णय झालेला आहे. आणि उर्वरित सर्वच कर्मचाऱ्यांच्या सुनावण्या होणार आहेत. दरम्यान या शाळेच्या सर्वच प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत परंतु तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी आर.बी. गवळी आणि संस्थेवर गुन्हा दाखल करण्यासोबतच या शिक्षकांवर ही गुन्हे दाखल करावेत असे आदेश दिले आहेत. आणि तेही पंधरा दिवसांच्या मुदतीमध्ये त्यामुळे हे गुन्हे दाखल करण्याची मुदत शनिवार दिनांक 17 रोजी संपत आहे .पुढील दोन दिवसांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी ,शिक्षण संस्था, सेवा संपुष्टात आलेले शिक्षक, आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यामध्ये काय घडामोडी होतात यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे लक्ष आहे.

                    भाग एक

गोदावरी शिक्षण संस्था (गोंदी )सह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्याचे विभागीय शिक्षण उपसंचालकांचे आदेश

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button