Jalna Districtजालना जिल्हाराज्य

बोहल्यावर चढणाऱ्या मुलीला वडील आणि काकांनी दिली फाशी ; मृतदेहही टाकला जाळून

जालना- बदनामीच्या भीतीने वडील आणि चुलत्यानेच 17 वर्षाच्या मुलीला फाशी देऊन जाळून टाकल्याची संताप जनक घटना चंदनझीरा पोलीस ठाणे अंतर्गत  जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव शिवारात घडली आहे. बोहल्यावर चढवण्यासाठी झालेली सर्व तयारी सोडून मुलीला चढविले फासावर.

सरकारतर्फे पोलीस कर्मचारी जितेंद्र शिवाजी तागवले यांनी चंदनझीरा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दिली आहे.तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी मृत मुलीचे वडील संतोष भाऊराव सरोदे आणि मुलीचे काका नामदेव भाऊराव सरोदे या दोन सख्ख्या भावांविरुद्ध यांच्याविरुद्ध खून केल्याचा भादवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलगी ही त्यांच्या नातेवाईकांच्या मुलासोबतच शिर्डी येथे फिरायला गेली होते आणि तीन दिवसानंतर ते दोघेही परत आले. त्यानंतर दोन्ही पक्षातील नातेवाईकांची बैठक झाली आणि विधिवत लग्न लावून देण्याचे ठरले. त्या नुसार आण्वि रोडवरील एका मंदिरात लग्नाची तयारी झाली ,हार देखील आले. यावेळी मुलीच्या वडिलांनी मुलीच्या नावावर अर्धा एकर शेती करावी अशी अट घातली परंतु मुलांच्या नातेवाईकांनी ही अट अमान्य केली. त्यामुळे तिथेच वाद वाढला आणि मुलीचे काका आणि मुलीचे वडील या दोघांनी मुलीला त्यांच्या घरी शेतवस्तीत घेऊन आले. तिथे मुलीच्या काकांनी आपला अपमान झाला झाल्यामुळे संताप व्यक्त केला आणि आता मीच फाशी घेतो असे वक्तव्य केले! या संतापामुळे मुलीचे वडील संतोष सरोदे हे देखील संतापून गेले आणि मुलीला मारहाण करून झाडाला लटकवले. काही वेळातच तिचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह देखील घराजवळच असलेल्या पोल्ट्री फार्मच्या जवळ जाळून नष्ट केला. आणि तिची राख दोन पोत्यांमध्ये भरून ठेवली आहे. प्रथमदर्शनी आज ही तक्रार नोंदवली आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत दरम्यान ज्या मुलासोबत ही मुलगी गेली होती त्याचाही तपास पोलीस घेत आहेत.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, या प्रकरणातील सतरा वर्षाची मयत मुलगी तीन दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या मुलासोबत पळून गेली होती घरातून पळून गेली होती, ती दिनांक 13 रोजी दुपारी घरी परत आली. परत आल्यानंतर तिची सर्व विचारपूस केली आणि तिच्यासोबत तिचे वडील संतोष सरोदे आणि नामदेव सरोदे यांचा वाद झाला .या वादा नंतर समाजामध्ये आपली बदनामी होईल या भीतीने या दोघांनी या मुलीला कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास दिला आणि ठार मारले. त्यानंतर कोणालाही काही माहिती न देता संध्याकाळी लगेच या मुलीचा मृतदेह जाळूनही टाकला. आणि ही घटना समाजापासून तसेच पोलिसांपासून लपवून ठेवली. ही माहिती या भागातील बीट अंमलदार जितेंद्र शिवाजी तागवाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पीरपिंपळगाव शिवारामध्ये पीरपिंपळगाव चे पोलीस पाटील श्री. बावणे यांच्याशी संपर्क करून संतोष भाऊराव सरोदे यांच्या शेतातील वस्तीवर जाऊन या प्रकरणाविषयी माहिती घेतली . त्यादरम्यान संतोष सरोदे आणि नामदेव सरोदे या दोघांनी झालेल्या घटनेची कबुली देऊन गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी चंदनझीरा पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे .दरम्यान पोलिसांनी दोन्ही गटातील नातेवाईकांची गावात बैठक घेऊन घटनेचा आढावा घेतला आहे. आणि तूर्तास गावामध्ये शांतता आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button