Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

“त्या” अंधारे नावाच्या…..- वारकरी संप्रदाय संतापला

जालना- शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा समाचार वारकरी संप्रदायाने घेतला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे त्यासोबत ज्या पक्षाच्या या नेते आहेत त्या पक्षाने सुषमा अंधारे यांना पक्षातून काढून टाकावे आणि वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली आहे असे न केल्यास सर्व वारकरी संप्रदाय या पक्षावर बहिष्कार टाकेल असा इशाराही वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे अध्यक्ष ह भ प रमेश महाराज वाघ यांनी दिला आहे अत्यंत संतापलेल्या स्वरात त्यांनी सुषमा अंधारे यांना उद्देशून काय म्हणाले ते व्हिडिओ पाहिल्यानंतरच लक्षात येईल.


जगाला विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या महामाऊली वैष्णव श्री. ज्ञानोबाराय यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मातील देवदेवता व साधुसंतांच्या बद्दल अनेक दिवसापासून अनेक वेळा सांप्रदायातील भाविक भक्तांच्या भावना दुखावण्याचे वक्तव्य करून अनेक वेळा साधू संतांची अवहेलना केली आहे. जगाला विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या संतश्री महामाऊली ज्ञानोबाराय यांच्या बद्दल अवहेलना केली आहे. या निवेदनावर ह.भ. प. रमेश महाराज वाघ अध्यक्ष वारकरी प्रबोधन सेवा मंडळ, बाबासाहेब आटोळे, अशोक महाराज पाथरूडकर, प्रकाश महाराज उंबरे, विनायक महाराज राठोड, सुभाष महाराज देंडगे, भगवान महाराज साबळे, ज्ञानेश्वर महाराज नांदे, रवींद्र महाराज मदने, गजानन महाराज मुळक सह्या आहे.

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button