पोलीस प्रशासनाने दिले विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे
जालना- जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनांक 15 आणि 16 असे दोन दिवसीय प्रशिक्षण पोलीस कवायत मैदानावर पार पडणार आहे. आज पहिल्या दिवशी शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थिनींनी या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यांच्यासोबतच शाळेच्या शिक्षिका आणि इतर सामाजिक कार्यकर्त्या महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उद्या शुक्रवार दिनांक 16 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळे दरम्यान प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे खुल्या मैदानात आणि सर्वांसाठी हे प्रशिक्षण.खुले आहे.
कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयातील 100विद्यार्थिनींचा सेल्फ डिफेन्स शिबिरामध्ये सहभाग नोंदवला .या शिबिरामध्ये विविध प्रात्यक्षिके करून दाखविले. त्यामधे शालेय साहित्याचा वापर ,पेन, सेफ्टी पिन, ओढणी यासारख्या साहित्याचा वापर करून स्व संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक धडे देण्यात आले. या शिबिरासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एम. एस. कुलकर्णी,शिक्षक संदिप इंगोले, श्रीमती. प्रगती भालेकर, श्रीमती. वंदना नन्नवरे उपस्थित होते.या शिबिरामध्ये जवळपास 15ते 20शाळांची उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी जालना जिह्याचे दामिनी पथकच्या रंजना पाटील याच्यासोबत सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचलन पोलिस अधिकारी संजय सोनवणे यांनी केले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com