Jalna Districtजालना जिल्हा

विनय विद्यालयात बावीस वर्षानंतर भरली पुन्हा माजी विद्यार्थ्यांची शाळा

जळगाव सपकाळ— भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विनय विघालयात सन 2000 साली दहावीची परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर सर्व विघार्थी पुढील शिक्षणासाठी गेले.पुढे शिक्षण पुर्ण करुन अनेकांनी विविध क्षेञांत नावलौकिक मिळवला.

तब्बल 22 वर्षानंतर या सर्व विघार्थ्यानी त्याच शाळेत पुन्हा एकदा अावडत्या गुरुजनांसोबत शाळा भरवली व नव्या जुन्या अाठवणींना उजाळा दिला.या स्नेहमिलन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन.एस.भुतेकर तर प्रमुख पाहुणे डि,टी.देशमुख सर होते तसेच व्यासपीठावर सेवानिवृत्तशिक्षक,व्ही.के.सपकाळ,पी.टी.सपकाळ,बाबुराव सपकाळ,डि.एस.पालकर,सेवानिवृत्त सैनिक मनसुबराव सपकाळ .दामोधर कोल्हे यांची उपस्थीती होती.यावेळी बोलतांना डि.टी देशमुख म्हणाले की तुम्ही अाज बाविस वर्षानंतर एकञ अाला अाहात त्यामुळे जिवनामध्ये वर्गमिञ म्हणुनच राहु नका तर एकमिञ म्हणुन रहा तसेच अापल्या शाळेसाठी माजी विघार्थी यांनी काही हातभार लावुन ग्रथांलय,विज्ञान प्रयोगशाळा यासह इतर मदतीसाठी येणार्‍या काळातील विघार्थ्यासाठी शाळेसाठी अापले काही देणे लागते या भावनेतुन मदतीचे प्रोत्साहन करावे असे बोलतांना म्हणाले तर अाईवडीलानंतर शिक्षकच हा अापला सर्वश्रेष्ठ गुरु असल्याने शिक्षकाचा अादर करा असेही संबोधीत केले.तसेच सेवानिवृत शिक्षक व्ही.के.सर म्हणाले की माजी विघार्थी यांनी स्नेहमिलन ठेवल्याने अाम्हाला बावीस वर्षानंतर मोठा अानंद झाल्याने भेटलेले विघार्थी नवी ऊर्जा देतात असे सांगितले तर पि.टी. सपकाळ यांनी सुध्दा जुन्या अाठवणीना उजाळा देत विघार्थी व शिक्षक यांच्यातल्या शालेय जिवनावर प्रकाश टाकुन अाठवनी जागवल्या.

एन.एस.भुतेकर,सि.पी.झाल्टे,अार.बी.जाधव,एस.अार.देवकर यांनी माजी विघार्थी यांचे अाज सुध्दा अाम्हाला तुमच्यामध्ये बावीस वर्षाअगोदर जे तुम्ही होते अाता सुध्दा तुमच्यामध्ये विघार्थी असल्याची भावना दिसत अाहे त्यामुळे सर्व विघार्थी यांना शुभेच्छा दिल्या. विघार्थी प्रतिनिधी म्हणुन डाँ.श्रीकांत सपकाळ जालना,प्रा. भरत पिंपळे.मोरेश्वर काँलेज भोकरदन .आशोक सोनुने. दयानंद खरात ग्रामविकास अधिकारी .मिथुन साळवे .दिपक सपकाळ, यांनी शालेय जीवनातील अाठवणीना उजाळा दिला.उपस्थीत सर्व सेवानिवृत्त तसेच शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात अाला तसेच सेवानिवृत्त सैनिक विघार्थी मनसुबराव सपकाळ .दामोधर कोल्हे यांचा सत्कार व शाळेतील तसेच दहावी व बारावी वर्गातील गुणवंत विघार्थी यांचा टृाफी देऊन सन्मान करण्यात अाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास सुसर यांनी केले तर सुञसंचालन दिपक सपकाळ यांनी तर अाभार एन.एस.भुतेकर यांनी मानले.
यावेळी शाळेचे सर्व कर्मचारी विघार्थी तसेच माजी विघार्थी यांची उपस्थीती होती.
“2000 च्या बॅचमधील विघार्थी यांनी मेळाव्याचे अायोजन करुन शाळेतील विघार्थी यांच्या वाचनात अावड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या ग्रथांलयासाठी 25 विविध पुस्तके भेट म्हणुन दिली .
“माजी विघार्थी स्नेहमिलन कार्यक्रमात विनय विद्यालयाचा 43वा वर्धापन दिनहीमोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला यावेळी यावेळी शाळेचे संचालक मंडळ ही ऊपस्तित होते. व राजर्षी शाहू महाराज.सरदार वल्हभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त यांना अभिवादन करण्यात आले.****

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles