केंद्र सरकारच्या कामाच्या आढाव्याचे रेल्वेस्थानकावर डिजिटल चित्र प्रदर्शन

जालना-केंद्र शासनाच्या 8 वर्षपूर्तीनिमित्त शासनाच्या गरीब कल्याणकारी योजना व गतिशक्ती विषयावर मल्टी मिडिया चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जालना येथील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आज जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन दि. 17 ते 21 डिसेंबर 2022 या 05 दिवसाच्या दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी इथे माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशाला मुलांची शाळेपासून एक फेरी काढण्यात आली होती या फेरीचे उद्घाटन उद्योजकता व विकास अधिकारी संपत चाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून केंद्राने केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा ठेवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. केंद्रीय संचार ब्युरोचे व्यवस्थापक संतोष देशमुख हे या प्रदर्शनाचे नियंत्रण करत आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com