Jalna Districtजालना जिल्हा

मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून त्यांनी दुसऱ्या प्रवेशद्वारात टाकली खुर्ची आणि दिला लेट लतीफ 24 कर्मचाऱ्यांना झटका

जालना- जालना जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. मंत्रालयाप्रमाणेच येथीलच कारभारी चालतो. प्रत्येक कर्मचारी कोणत्या ना कोणत्यातरी लोकप्रतिनिधीचा वरदहस्त घेऊनच जिल्हा परिषदेत प्रवेश करतो ,त्यामुळे आपलं कोणीच काही करू शकत नाही अशी त्याची भावना होते. त्यामुळे काम सोडून इतर भानगडी मध्ये त्यांचे जास्त लक्ष असते. पर्यायाने कार्यालयात येण्यापासून त्यांची मनमानी सुरू असते ,एवढेच नव्हे तर कार्यालयात आल्यावर टेबलवर एखादी संचिका उघडून ठेवायची आणि वरिष्ठांकडे गेलो म्हणून निरोप द्यायचा आणि गायब व्हायचे हे नेहमीचेच आहे. अनेक कर्मचारी हे कार्यालयात कपाट उघडून ठेवतात, गॅस आणायला जातात, मुलाला शाळेत सोडायला जातात, पत्नीला शाळेतून घेऊन येण्यासाठी जातात, आणि सर्व काही त्यांच्या सोयीने चालत असते, आणि त्यांच्या वेळेनुसार ते जिल्हा परिषदेमध्ये येतात.

आज मात्र जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती वर्षा मीना यांनी अशा लेट लतीफ कर्मचाऱ्यांना चांगला झटका दिला आहे. जिल्हा परिषदेचे दक्षिणेकडे असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराला सकाळी दहा वाजताच कुलूप ठोकले आणि पूर्वेकडील प्रवेशद्वारात वर्षा मीना खुर्ची टाकून बसल्या. दहा ते साडेदहा दरम्यान आलेल्या 24 लेट लतीफ कर्मचाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले त्यासोबत कारणे दाखवा नोटीसही बजावल्या आहेत. असा प्रकार तीन वेळेस लक्षात आल्यानंतर चौथ्या वेळेस चौकशी करण्याचे सुतवाचे देखील त्यांनी केले आहे. त्यामुळे आता एक- दुसऱ्याला सांभाळून घेणारे कर्मचारी देखील आज जिल्हा परिषदेत दिसले नाहीत. अन्यवेळी अकराचा चहा पिण्यासाठी जाणारे कर्मचारी, दुपारी घरी जेवायला जाणारे कर्मचारी, परत चार चा चहा पिण्यासाठी खाली जाणारे कर्मचारी जागेवरच ठाण मांडून बसल्याले दिसले. बहुतांश वेळा हे कर्मचारी कार्यालयात येतच नाहीत आणि आलेल्या गरजूंना ते साहेबाकडे गेले आहेत, मिटींगला गेले आहेत हे नेहमीचेच रडगाराने त्यांच्या सहकाऱ्यांकडून ऐकावे लागते.

एक मात्र खरे की आज केलेल्या या कारवाईमुळे पुढील पंधरा दिवस तरी जिल्हा परिषदेत कर्मचारी दिसतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण पंधरा दिवसांनी श्रीमती वर्षा मीना या पुन्हा ठाण मांडून बसणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले आहे.****

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button