आता बोला🤦♂️, चोरांकडून जप्त केलेल्या मुद्देमालावर पोलिसानेच मारला डल्ला; गुन्हा दाखल
जालना- रखवालदारानेच तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रकार जालना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. फक्त हद्दीतच नव्हे तर पोलीस ठाण्यातच घडला आहे आणि तो देखील पोलिसानेच केल्याचा आरोप चौकशीनंतर ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या इज्जतीची लक्तरे वेशीला टाकणारा आणखी हा एक प्रकार.
जालना तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रमेश बाजीराव जायभाये यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जालना तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन मोहरील पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. चव्हाण बक्कल नंबर 656 हे मोहरील म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नेमणूक अंबड येथे झाली. दरम्यान दिनांक 22 जुलै 2015 ते 26 ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान विविध गुन्हा मध्ये पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा एस. बी. चव्हाण यांच्या निगराणीखाली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता. सुमारे 40गुन्ह्यामध्ये जप्त केलेला हा सोन्या चांदीचा मुद्देमाल पोलीस जमादार श्री. चव्हाण यांनी निष्काळजीपणाने हलगर्जी करून आणि भ्रष्ट स्वरूपाचे वर्तन करून लंपास केला आहे. याप्रकरणी महानगरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे कलम 3चे उल्लंघन केले आहे .त्यामुळे भादवि कलम 420 अन्वये हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीनंतर गुन्हा दाखल हेडकॉन्स्टेबल एस बी चव्हाण यांची जालना तालुका पोलीस ठाण्यातून बदली झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मोहरील पदाचा पदभार इतर कर्मचाऱ्यांकडे सोपवण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात होते मात्र मुद्देमाल तपासून हा पदभार देण्यासाठी एस बी चव्हाण समोरच येत नव्हते शेवटी पंचा समक्ष चोरीमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची तपासणी केली आणि त्यामध्ये 40 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला आठ लाख चार हजार 894 रुपयांचा मुद्देमाल हा टंच पावती प्रमाणे आणि (प्रत्यक्षात आठ लाख 51 हजार,097 रुपयाचा नगदी) मुद्देमाल गायब केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वडते हे करीत आहेत.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com