समृद्धीला चालना देणाऱ्या महा एक्सपोची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी ;उद्यापासून सुरुवात.
जालना -कोरोना काळाच्या खंडानंतर जालना शहरात पुन्हा एकदा महा एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ जालना आणि रोटरी क्लब ऑफ जालना मीडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 21, 22 आणि 23 असे तीन दिवशीय हे आयोजन आहे.
जालना शहरात भोकरदन नाका ते मोंढा रस्त्यावर श्रीकृष्ण नगर येथे सुरू होणाऱ्या या एक्सपोची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांनी केली. यावेळी या क्लबचे पदाधिकारी धवल मिश्रीकोटकर, किशोर देशपांडे, प्रकल्प संचालक प्रतीक नानावटी ,भावेश पटेल, आदींची यावेळी उपस्थिती होती.
जालना शहराचा वाढता विकास त्यातच केमिकल कॉलेज, ड्रायपोर्ट ,समृद्धी महामार्ग ,रेल्वेची पीट लाईन, अशा विविध कामांच्या माध्यमातून होत असलेला हा विकास महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या विविध कन्याकोपऱ्यापर्यंत पोहोचवता येईल आणि इतर ठिकाणी असलेले नवीन तंत्रज्ञान, उद्योग, व्यवसाय याविषयीची माहिती आत्मसात करून जालन्यातही अशा प्रकारच्या उद्योगांना चालना मिळण्यासाठी हा एक्सपो फायद्याचा ठरेल असा अशी आशा आयोजकांना वाटत आहे.
दरम्यान फक्त उद्योग व्यवसाया पुरताच हा एक्सपो नसून शालेय विद्यार्थी बचत गट माहिती तंत्रज्ञान, करमणूक अशा सर्वच बाबींचा यामध्ये समावेश असल्याचेही आयोजकांनी सांगितले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com