कल्पनाशक्तीची आकाशाला गवसणी; 4हजार 700 पाण्याच्या बॉटल पासून तयार केले रॉकेट; पहा?कुठे?कसे?
जालना -शहरामध्ये उद्या दिनांक 21 पासून रोटरी क्लब ऑफ जालना आणि रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय महा एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे.
या एक्सपो मधील एक उल्लेखनीय आणि आकर्षित करणारे कला शिल्प पाहायला मिळणार आहे. प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता पिण्याच्या पाण्याच्या फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बॉटल पासून 51 फुटांचे रॉकेट तयार करण्यात आले आहे. सुमारे 4700 बॉटल्स या रॉकेट साठी वापरण्यात आल्या आहेत. टाकाऊ पासून टिकाऊ हा संदेश देतानाच डोकं लावलं तर प्लास्टिकचा पुनर्वापर कसा आणि कुठे करता येतात करता येईल याचेही ज्वलंत उदाहरण म्हणजे हे रॉकेट!. साधारणपणे माणूस पाणी पिल्यानंतर प्लास्टिकची बॉटल फेकून देतो परंतु ही बॉटल जर आपण उपयोगात आणायची ठरवली तर तीच्या पासून विटा तयार करता येऊ शकतात,शोभेच्या वस्तू तयार होऊ शकतात. आणि अन्य काही कल्पक वृत्ती वापरली तर ती बॉटल कशी उपयोगात आणता येऊ शकते त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे .
जालना शहरांमध्ये प्लास्टिक संकलन करणाऱ्या काही संस्था तयार झाल्या आहेत आणि या संस्था शहरामध्ये फेकून दिलेले प्लास्टिक जमा करतात. जमा झालेले प्लास्टिक फेकून दिलेल्या या पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरतात आणि त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यासाठी इतरत्र पाठवतात. त्यामुळे प्लास्टिकचा पुनर्वापरही होतो आणि शहरही प्लास्टिक मुक्त होत आहे.उद्योजक सुनील रायठठा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या 51 फुटाच्या रॉकेटला पेशाने शिक्षक असलेल्या डॉ. रवी कोंका यांनी मूर्त स्वरूप दिले आहे .महा एक्सपोर्टच्या प्रवेशद्वारासमोरच आपल्याला फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बॉटल पासून तयार करण्यात आलेले हे 51 फूट रॉकेट पाहायला मिळणार आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com