व्यवहार बंद ठेवून जैन समाजाने केला झारखंड सरकारचा निषेध
जालना- जैन समाजाच्या चारही पंथांचे तीर्थक्षेत्र असलेले झारखंड राज्यातील श्री सम्मेद शिखरजी (जिल्हा गिरीडाह)या ठिकाणाला झारखंड सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. या दर्जामुळे या तीर्थक्षेत्राला हानी पोहोचण्याची शक्यता आहे .
एकंदरीतच पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी शासन विविध उपाय योजना करू शकते. त्यामध्ये दुकाने, व्यावसायिक ठिकाणं, आणि अशा व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी मांसाहार, धुम्रपान, मध्यप्राशन, अशा प्रकारची व्यसनाधीनता होऊन विकासाच्या आड येणाऱ्या वृक्षांची तोडही होऊ शकते, पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जैन समाजातील श्वेतांबर, दिगंबर, तेरापंथी आणि मंदिरमार्गी या चारही पंथीयांनी आज जालना शहरात आपले व्यवसाय बंद ठेवून झारखंड सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यासोबत या तीर्थक्षेत्रेला दिलेला पर्यटन स्थळाचा दर्जा मागे घ्यावा अन्यथा यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही सकल जैन समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यामध्ये सुमारे 20 हजाराच्या जवळपास या जैन समाजाचे वास्तव्य आहे. 200 च्या जवळपास समाज बांधवांची विविध प्रकारचे व्यवसाय आहेत.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com