Jalna Districtजालना जिल्हा

मिनी मंत्रालयात महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणार तक्रारींचा निपटारा

जालना -मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आता दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तक्रार निवारण केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी दिली आहे. शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे काम ग्रामपंचायत , पंचायत समिती, जिल्हा परिषद, अशा विविध टप्प्यांवरअडकून पडते. दप्तर दिरंगाई मुळे या कामात हलगर्जीपणा होतो, आणि कर्मचारी वेळेवर भेटत नाहीत त्यामुळे जनतेची कामे खोळंबून राहतात, नाहक जनतेला पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो.

या बाबी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जालना जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दुपारी बारा ते दोन या वेळेत तक्रार निवारण दिन आयोजित केला आहे. या तक्रारी निवारण्यासाठी सर्व विभागांचे विभाग प्रमुख, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जनतेच्या तक्रारींचा सोक्षमोक्ष त्याच वेळेस लावल्या जाण्याची शक्यता आहे. कदाचित कागदपत्रांअभावी काही तक्रारींचा निपटारा राहिला तर पुढील पंधरा दिवसांमध्ये त्या मार्गी लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी समन्वयक अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग प्रदीप काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारींचा निपटारा लवकर होण्यास मदत होणार आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरी संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून दुसऱ्या प्रवेशद्वारात बसून श्रीमती मीना यांनी 24 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती आणि आता पुन्हा या तक्रार निवारण दिनामुळे जनतेला कर्मचारी भेटतील आणि तक्रार दूर होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.****

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून त्यांनी दुसऱ्या प्रवेशद्वारात टाकली खुर्ची आणि दिला लेट लतीफ 24 कर्मचाऱ्यांना झटका

Related Articles