जाणून घ्या कोण आहे ती ?भारतातील चार विविध पुरस्कार प्राप्त एकमेव खेळाडू जी जालन्यात देत आहे खो-खोचे प्रशिक्षण
जालना( दिलीप पोहनेरकर) जालना जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी उभी केलेली क्रीडा प्रबोधिनी संस्था आता चांगलेच रूप धारण करायला लागली आहे. केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवून देण्यासाठीच ही संस्था उभी केली आहे. आणि ती आता नावारूपाला येताना दिसत आहे. त्याचे कारण असे की अखिल भारतीय स्तरावरील तीन विविध पुरस्कार प्राप्त तसेच राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार असे एकूण चार पुरस्कार मिळालेली भारतातील एकमेव खेळाडू आता या प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना खो-खो चे धडे गिरवीत आहे.
त्याचा परिणाम ही दिसायला लागला आहे. दिनांक 22-23 रोजी झालेल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने विभागीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये जालनाच्या जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत राज्यस्तरावर खेळण्याचा मान मिळविला आहे.हे तर झालं क्रीडा प्रबोधिनीची उभारणी आणि विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मात्र इथे लावलेल्या रोपट्याला खतपाणी घालून त्याला बहारदार करण्याचे काम बारा वर्ष खो-खो खेळल्यानंतर विविध पुरस्कार मिळविलेल्या सातारा जिल्ह्यातील खेळाडू प्रियंका येळे या करीत आहेत .गेल्या सहा महिन्यांपासून त्या या क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांना आत्तापर्यंत 14 वर्षाखालील खेळासाठी दिला जाणारा” इला अवार्ड” अठरा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी जाणारा” जानकी अवार्ड” आणि वरिष्ठ गटाचा” राणी लक्ष्मीबाई अवार्ड”हे अखिल भारतीय स्तरावर खो- खो खेळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्या जातात आणि या तिन्ही या तिन्ही अवार्डसह राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा” शिवछत्रपती पुरस्कार” असे एकूण चार पुरस्कार मिळालेल्या प्रियंका येळे या सध्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना खो-खो चे धडे गिरवीत आहेत.
त्यांच्या मदतीला जिल्हा क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख म्हणून प्रमोद खरात तर त्यांना सहकार्य म्हणून संतोष दोरखे, रवींद्र ढगे, राजू पुरी, प्रियंका येळे, विजय खेडेकर, बाललक्ष्मी पेती, संतोष मोरे, हे कार्यरत आहेत. क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे संतोष वाबळे हे देखील कार्यरत आहेत.
*14 वर्षे वयोगट मुले*
(विजेता संघ)कै. नानासाहेब पाटील विद्यालय नजीक पांगरी तालुका बदनापुर जिल्हा जालना.
(उपविजेता संघ )बहिर्जी स्मारक विद्यालय ,वसमत जिल्हा हिंगोली.*१७ वर्षे वयोगट मुले*
(विजय संघ) जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, जालना
(उपविजेता संघ)-सैनिकी विद्यालय, बीड***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com