चक्री उपोषणकर्त्या ९५ वर्षे वयाच्या वृद्धेचा मृत्यू; प्राचार्यांवर गुन्हा दाखल
जालना- राज्य शासनाने 70 वर्षांपूर्वी बळवंत गायकवाड या जखमी झालेल्या माजी सैनिकाला औरंगाबाद महामार्गावर वीस एकर चार गुंठे जमीन दिली होती. सध्या या जमिनीवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आणि चंदंनजिरा पोलीस ठाण्याची इमारत आहे. असा दावा गायकवाड परिवाराने केला आहे. आणि हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान या जागेवर स्वच्छता करत असताना आठ नोव्हेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी आणि अन्य काही सहकाऱ्यांनी त्यांना मज्जाव केला होता. आणि धाक दपट करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करून या प्राचार्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बळवंत गायकवाड यांची सून त्यांच्या परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालय समोर चक्री उपोषणाला बसल्या होत्या. दरम्यान गेल्या 40 दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणामध्ये कस्तुराबाई ह्या दोन-तीन वेळा येऊन गेल्या आणि काल दिनांक 25 रोजी पुन्हा त्या उपोषण ठिकाणी आल्या होत्या. या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करून जोपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहाचा अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा या परिवाराने घेतला होता. त्यामुळे सकाळपासूनच वातावरण तापलेले होते.
पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, चंदंनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मझहर, यांच्यासह उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, यांनी मध्यस्थी करूनही गायकवाड परिवार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे शेवटी साडेचार वाजेच्या सुमारास प्राचार्यावर सह अन्य चार जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आला आहे.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com