रोख एक कोटी 70 पळवून चोरट्याने पोलिसांना दिले आव्हान!
जालना- तिजोरी मध्ये ठेवलेल्या एक कोटी सत्तर लाख रुपयांची रोकड पळून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. जालना शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या नथूमल कापड दुकानात ही घटना घडली.
दिनांक 23, 24, 25 असा तीन दिवस केलेला व्यवसाय आणि त्यामधून आलेले रोख रक्कम या दुकानात असलेल्या तिजोरीमध्ये दिनांक 25 च्या रात्री ठेवली होती .सुमारे एक कोटी 70 लाख 1075 रुपये एवढी ही रक्कम होती .ज्यामध्ये चलना मधील 10 ,20, 50, 100, 500 आणि 2000 च्या नोटा होत्या. ही रक्कम काल आठ ते आज सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तिजोरी फोडून पळवून नेली. त्यासोबत या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही नासधूस केली आहे. याप्रकरणी दुकानाचे मालक महेश नथूमल नाथांनी व 54 वर्ष ,राहणार दुर्गा माता रोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com