Jalna Districtजालना जिल्हाराज्य

…परंतु त्यांना साईबाबा पावलेच नाहीत; स्वतःला दुकानात कोंडून दुकानाच्या नोकरानेच पळवली एक कोटी 70 लाखांची रोकड; शिर्डी येथून परततांना पोलिसांनी घातली झडप

जालना-दोन महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केलेल्या नोकरानेच मालकाच्या तिजोरीवर डल्ला मारून एक कोटी सत्तर लाख रुपये पळवले होते. ही रक्कम पळविण्याचा एक महिन्यापूर्वीच कट शिजला होता आणि त्यासाठी या आरोपीने दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याची संधी साधली. त्यामुळे मालकाने व्यवसायातून आलेली रक्कम तिजोरीतच ठेवली आणि या पठ्याने स्वतःला रविवारी रात्री एका खोलीत कोंडून घेतले आणि ही रक्कम तीन मित्रांच्या मदतीने पळवली. दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत नथूमल वासुदेव या कापड दुकानातील कामगार कुणाल मनोज महाडीवाले वय वर्ष 22 राहणार बरवार गल्ली कादराबाद जालना, याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या अन्य तीन मित्रांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक कोटी सत्तर लाख रुपये हस्तगत केले आहेत. दरम्यान रक्कम पडवीला नंतर या मित्रांनी शिर्डीच्या साईबाबांचे ही आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. परंतु त्यांना साईबाबा पावलेच नाहीत. ते परत येत असतानाच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी औरंगाबाद येथे त्यांच्यावर झडप घातली.

शनिवार- रविवार दोन दिवस बँकेला सुट्टी आल्यामुळे मालकाने तिजोरी ठेवलेली रक्कम कुणाल महाडीवाले यांनी पाहिली होती आणि ठरलेल्या नियोजनानुसार तो रविवारी रात्री दुकानातीलच एका खोलीत लपून बसला होता. रात्री आठ वाजता दुकान बंद झाल्यानंतर त्याने त्याचे साथीदार दुर्गेश ढोलके वय 21 राहणार बरवार गल्ली कादराबाद, आणि रोहन पुनमचंद नाईक व 21 राहणार बरवार गल्ली कादराबाद जालना या दोघांना दुकानाच्या बाहेर माहिती देण्यासाठी ठेवले होते. दुकान बंद झाल्यानंतर दुकानाच्या परिसरात सामसूम असल्याची खात्री झाल्यानंतर कुणाल महाडिक याने तिजोरीचा दरवाजा तोडला आणि तिजोरीजवळ ठेवलेली व तिजोरीच्या बाहेर असलेली एक कोटी 70 लाख रुपयांची रोख रक्कम पळवली. ही रक्कम पळविण्यासाठी त्याने एका प्रवासी बॅगेचाही वापर केला आहे. बाहेर पडताना त्याने आतून शटर उघडले आणि बाहेर थांबलेल्या दोन मित्रांनी त्याची मदत केली. बाहेर पडतात त्याने एका स्कुटीवरून त्याचा आणखी एक मित्र राजू लालचंद नाईक 38 वर्ष राहणार बरवार गल्ली कादरबाद यांच्या मदतीने जालना शहरातीलच एका शटरमध्ये पैशाची बॅग लपवून ठेवली होती. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कुणाल महाडीवाले याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने या सर्व गुन्ह्याची कबुली दिली आहे, आणि लंपास केलेले एक कोटी सत्तर लाख तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली, स्कुटी, मोबाईल, असे सुमारे 89 हजाराचे अन्य साहित्य असा एकूण एक कोटी 70 लाख 35 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

मोंढ्या सारख्या मध्यवस्तीत आणि एवढ्या मोठ्या दुकानात, एवढी मोठी रोख रक्कम पळविल्याची घटना घडल्यामुळे मोंढ्यासह इतर व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली होती. तिजोरी असणाऱ्यांची ही परिस्थिती तर सामान्य माणसांचे आणि व्यापाऱ्यांचे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता?

हा तपास लावण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेने चार पथक तयार केले होते आज झालेल्या या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग ,सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे ,संजय मगरे ,गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे, गोपाल गोशिक, सचिन राऊत ,विनोद गडदे, किशोर पुंगळे, सुभाष पवार, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, मनोहर भुतेकर, गजानन डोईफोडे, आदींनी परिश्रम घेतले.*****

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button