Jalna Districtजालना जिल्हाराज्य

स्वागत नववर्षाचे: मद्यप्रेमींचा उत्पादन शुल्क विभागाला पुळका, पहाटे पाच वाजेपर्यंत “पीओजी भरके”.दुसरीकडे108 हनुमान चालीसा संगीतमय हवन.

जालना- सरत्या वर्षाच्या समाप्तीला अवघे दोन दिवस बाकी आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचे नियोजन सुरू आहे. या नियोजनाचा एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभाग मद्यप्रेमींवर मेहरबान झाला आहे आणि त्यामुळे मद्य विक्रीचे सर्व दुकाने एक जानेवारीच्या एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत तर परमिट रूम आणि बियर बार (ज्यामध्ये बसून पाणी पिण्याची व्यवस्था आहे) अशी सर्व प्रतिष्ठाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे मद्यपींच्या आनंदामध्ये भर पडली आहे. परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही व्यावसायिकांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कुठलीही योजना अद्याप पर्यंत जाहीर केलेली नाही. त्यामुळे मध्यपिनच्या दारू विक्रेत्यांच्या दुकानासमोरील चकरा वाढल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या दारू दुकानासंदर्भातील माहिती

एफ एल टू- म्हणजेच विदेशी दारू किरकोळ विक्रेते- 6.सी एफ एल थ्री- देशी विदेशी किरकोळ विक्रेते- 6
एफ एल बी आर- बिअर शॉपी जे फक्त बियर आणि वाईन्स किंवा धान्य व द्राक्ष आधारित दारू विक्री करतात-68 .सी एल थ्री- देशी किरकोळ विक्रीची दुकाने86 आहेत. सी एल थ्री- या प्रकारामध्ये परमिट रूम आणि बियर बार यांचा समावेश आहे. (म्हणजेच ज्या ठिकाणी बसून पिण्याची व्यवस्था आहे असे ठिकाण)342.दारू पिण्यापूर्वी काढा परवानादारू पिण्यासाठी परवाना आवश्यक आहे. त्यानुसार कायमस्वरूपी परवान्यामध्ये सन 2018 पासून आत्तापर्यंत 3281 परवाने देण्यात आले आहेत. हे परवानाधारक 12 युनिट आपल्या सोबत स्वतःसाठी बाळगू शकतात परंतु त्याची विक्री करू शकत नाहीत.* तात्पुरता परवाना दारू पिण्यासाठी तात्पुरताही परवाना मिळतो. जिथे दारू प्यायची आहे त्याच ठिकाणी देशी दारू पिण्यासाठी दोन रुपये देऊन तुम्ही परवाना काढून अधिकृतपणे देशी दारू पिऊ शकता तर बियर बार मध्ये हाच परवाना काढण्यासाठी तुम्हाला पाच रुपये मोजावे लागतील आणि हा परवाना काउंटरवरून घेऊन तुम्ही दारू पिऊ शकता अशा. परिस्थितीमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी तुमच्यावर कारवाई करू शकत नाहीत. त्यामुळे जर प्यायचीच असेल तर अधिकृतपणे परवाना काढून प्या.इतर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहे एप्रिल ते नोव्हेंबर 2022 दरम्यान एक कोटी 29 लाख रुपये महसूल मिळाला आहे. ज्यामध्ये परवाना नूतनीकरण, दंड, याचा समावेश आहे. याच कालावधीमध्ये 58.67 बल्क लिटर देशी दारू विक्री झाली आहे. ज्याची किंमत 58 लक्ष 67 हजार एवढी आहे तर विदेशी मध्यामध्ये 18.14 बल्क लिटर, बियर 16.22 बल्क लिटर, आणि वाईन 22.5 बल्क लिटर एवढी विक्री झाली आहे. इथे करा तक्रार अवैध दारू निर्मिती, दारू विक्री ,दारू वाहतूक, यासंबंधी काही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 1800 233 99 99 व्हाट्सअप क्रमांक 84 22 001133 आणि दूरध्वनी क्रमांक 0253 23 19 744 यावर संपर्क साधावा.

एकीकडे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मद्यप्रेमी दारूचे पेग रिचवणार आहेत तर दुसरीकडे भक्तगण बजरंगबलीला आळवण्यासाठी यज्ञामध्ये आहुती टाकणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त “एक शाम महा सत्संग के नाम” परिवाराच्यावतीने दोन दिवसीय सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार रविवार दिनांक 30 रोजी दुपारी दोन वाजता बडी सडक येथील श्रीराम मंदिरातून एक रथयात्रा निघणार आहे, आणि जिंदल मार्केट येथील गोकुळ लॉन्स वर पोहोचणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून नववर्षाच्या स्वागतापर्यंत 108 हनुमान चालीसा संगीतमय हवन होणार आहे. भक्तगणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.****

दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button