जीवनावश्यक किटचे वाटप करून लायन्स क्लब ने दिल्या अतिवृष्टी भागातील गरजूंना नववर्षाच्या शुभेच्छा!

जालना – अतिवृष्टीने बाधीत झालेल्या जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी, विधवा महिलांना लॉयन्स क्लब च्या अंतरराष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्थानिक लॉयन्स क्लब सदस्यांच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किट वितरणास आज दि.31 ला सुरुवात झाली आहे. प्रांतपाल लॉ. पुरूषोत्तम जयपुरिया यांच्या हस्ते घनसांगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथून या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
अंबड व घनसावंगी तालुक्यातील 20 गावांत 2,000 जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वितरित केल्या जाणार आहेत.माहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाली, परिणामी शेतकऱ्यांसमोर अनेक यक्ष प्रश्न उभे राहिले. हीच बाब हेरून आपत्तीग्रस्त शेतकरी, विधवा महिला यांना लॉयन्स क्लब तर्फे मदत मिळावी या हेतूने प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांनी स्थानिक सदस्य आणि गावनिहाय आपत्तीची माहिती संकलित करून लॉयन्सच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयात पाठवली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्राप्त झालेली मदत आणि स्थानिक दानशूर सदस्यांच्या सहकार्याने थंडी पासून बचावासाठी उबदार चादर, जीवनावश्यक वस्तूंच्या कीट तयार करण्यात आल्या. अंबड तालुक्यातील लालवाडी,शेवगा, पारनेर, धनगर पिंपरी, बनटाकळी, हरतखेडा,तर घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी,मुरमा, गुरुपिंपरी, राणी उंचेगाव, कृष्णनगर येथे मदत वाटप करण्यात आली. उर्वरित गावांना टप्प्या-टप्प्याने मदतीचे वितरण केले जाईल, असे प्रांत सचिव लॉ. अरुण मित्तल यांनी सांगितले.
कार्यक्रमास लॉयन्सचे प्रांत सदस्य अग्रविभूषण लॉ. सुभाषचंद्र देवीदान, विभागीय अध्यक्ष लॉ. सुनील बियाणी, प्रभाग अध्यक्ष लॉ. विनोद पवार ,लॉ.सुशील पांडे, लॉ.धर्मेंद्र कुमावत, जालना लॉयन्सचे अध्यक्ष लॉ.राजेश भुतिया, लॉ.राधेश्याम टिबडेवाल,लॉ.मनोहर खालापुरे, लॉ.द्वारकादास मुंदडा, डॉ .सुयोग कुलकर्णी, लॉ कैलास राठी, लॉ. अरुण शर्मा, लॉ. शैलेश तिवारी, लॉ.सागर सोमानी, लॉ.बाळू लाहोटी, लॉ. संजीव मैंद,लॉ. शरद मगर, लॉ.शिवाजी गाडेकर, लॉ.राम खरात, प्रदीप शिंदे,
डॉ .सुयोग कुलकर्णी,महेश कोल्हे, डॉ. सुशील जवळकर, पाराजी आस्कंद, श्रीराम बोंडारे आदींची उपस्थिती होती.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com