मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेच्या दिनदर्शिकेचे विमोचन
जालना- मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कॉपरेटिव बँकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन ह. भ. प. भगवान बाबा आनंदगडकर यांच्या हस्ते आणि सूर्यकांतेश्वर महाराज सोलगव्हाण, मनोज महाराज गौड, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत आणि उपाध्यक्ष मधुसूदन मुत्याल यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या दिनदर्शिकेच्या प्रकाशन समारंभाला सीए गोपाल अग्रवाल, ह. भ. प. शिंदे महाराज अंबड, सुभाषचंद देविदान, यांच्यासह बँकेचे संचालक वीरेंद्र रुणवाल, गोवर्धन अग्रवाल, नरेश गुप्ता, बँकेचे महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा, यांची उपस्थिती होती. बँकेचे व्यवस्थापक शिरीष देवळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सीए गोपाल अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सामान्य माणसासाठी वर्षभर ही दिनदर्शिका उपयोगी ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.***
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com