एक जिल्हाधिकारी, एक आमदार ,एक आयुक्त ,एक पत्रकार

जालना-केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये आज एक तारीख ,एक दिवस, एक तास, स्वच्छता ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. याच मोहिमेसाठी एकत्र आलेल्या अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकाराने स्वच्छता आणि सुशोभीकरणासाठी सहभाग नोंदविला.
जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ हे आज मोती तलावाच्या काठावर स्वच्छता मोहिमेसाठी आले होते. याच मोहिमेसाठी आमदार कैलास गोरंट्याल, जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर आणि ईडीटीव्हीचे प्रतिनिधी दिलीप पोहनेरकर हे देखील तिथे उपस्थित होते. या स्वच्छते मोहिमेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोती तलावाची आणि मोतीबागेची पाहणी करण्यासाठी नावे मधून दौरा केला. यावेळी आयुक्त श्री. खांडेकर यांनी मोती तलावात असलेली विहीर आणि काठावरच्या शुशोभीकरणाविषयी माहिती दिली. दरम्यान तलावातून मोतीबागेत गेल्यानंतर तिथे सुरू असलेल्या राष्ट्रध्वजाच्या उभारणीच्या कामाचीही पाहणी केली. यावेळी आमदार गोरंट्याल यांनी पूर्वी मोती बागेमध्ये कॅन्टीन होती, तशीच कॅन्टीन पुन्हा सुरू करावी, तसेच मोती तलावाच्या बाजूलाच असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव पुन्हा सुरू करावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी मोतीबाग आणि मोती तलावाच्या सुशोभीकरणासाठी काही प्रस्ताव असतील तर ते त्वरित पाठवावेत अशा सूचना आयुक्त संतोष खांडेकर यांना दिल्या.
https://whatsapp.com/chnnel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
for News&advt- DilipPohnerkar
–9422219172