953 रिक्त पदांसाठी उद्या बुधवारी रोजगार मेळावा

जालना -मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार दिनांक 4 रोजी सकाळी नऊ ते चार वाजेच्या दरम्यान “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर असलेल्या औद्योगिक वसाहती मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्यात रोजगार विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दहावी बारावी, आयटीआय, बीए. बीकॉम, डिप्लोमा, एम. एस. डब्ल्यू ,एमबीए, एमएससी ऍग्री, अशा विविध पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी 12 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत .953 उमेदवारांची या मेळाव्यातून निवड होऊ शकते.
या कंपन्यांमध्ये आहेत रिक्त पदे एन आर बी बेरिंग जालना 30 ,धूत ट्रान्समिशन शेंद्रा 300 ,यशस्वी अकॅडमी फॉर स्किल छत्रपती संभाजीनगर 200, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी वाळूज २१,कूस कार्पोरेशन लिमिटेड पुणे 200 ,महीको जालना चार, ओम साई मॅनपावर वाळूज 50, फुलंब्री टे कॉम जालना 70, कॉपी व्हिजन इंफोर्समेंट जालना 21, एलजीबी जालना 20, नवभारत फर्टीलायझर्स छत्रपती संभाजी नगर 28, अशा एकूण 953 रिक्त पदांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाआहे.
ही कागदपत्रे सोबत ठेवा किमान पाच प्रति मध्ये बायोडाटा ,शैक्षणिक कागदपत्रे ,आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी, सह नऊ वाजता उमेदवारांनी उपस्थित राहून मुलाखती द्याव्यात.
https://whatsapp.com/chnnel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
for News&advt- DilipPohnerkar
–9422219172