Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

कल्पनाशक्तीच्या जोरावर जालन्याच्या भूमिपुत्राचा देशभरात डंका; पशुधन आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे

जालना- जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यात राहणाऱ्या सुनील शिंदे या शेतकऱ्याने शेती आणि घरगुती उपकरणांच्या क्षेत्रात विविध प्रयोग करून पशुधनाला होणारी मदत , दैनंदिन जीवनात अन्नधान्य वापरण्यासंदर्भात पीठ गिरणीच्या माध्यमातून मांडलेली संकल्पना आणि एकंदरीतच वेगवेगळ्या 28 प्रयोगांची दखल घेत “संत ईश्वर सेवा सन्मान” पुरस्कार देऊन सुनील शिंदे यांचा गौरव करण्यात आला आहे.

देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा या संस्थेच्या वतीने सत्कार केला जातो, रोख रक्कम स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यामध्ये छत्तीसगड राजस्थान, पश्चिम बंगाल, नागालँड, केरळ या राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातून केवळ एकमेव शेतकरी सुनील शिंदे यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील जनतेचे आणि पशुधनाचे जीवन सुकर करण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये पार पडलेल्या या पुरस्काराला भैय्याजी जोशी पूर्व कार्यवाह ,लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला ,केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. सुनील शिंदे यांच्यासोबतच चांद्रयान मोहीम यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांचाही यावेळी “संत ईश्वर सेवा सन्मान” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.  दरम्यान या संदर्भात सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आत्तापर्यंत वेगवेगळे 28 उपकरणे तयार केले आहेत. त्यामध्ये विशेष उपकरण म्हणजे रेशीम उद्योगांमध्ये कोश एकत्र बांधून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या “चंद्रिका” या उपकरणाचा समावेश आहे. आणि त्याला शासनाचे पेटंटही मिळालेले आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button