कोतवाल परीक्षेचे पेपर फुटले; पाच जण पोलिसांच्या ताब्यात; राष्ट्रमाता इंदिरा गांधी परीक्षा केंद्रावरील प्रकार
जालना- कोतवाल पदाच्या 69 उमेदवारांसाठी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली जालना जिल्ह्यात 19 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. दरम्यान राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवर पाच विद्यार्थ्यांकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आढळून आले . स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या पाचही जणांना ताब्यात घेतले आहे आणि कसून चौकशी सुरू आहे. बदनापूर तालुक्यातील हे उमेदवार आहेत. कधी निघाली प्रश्नपत्रिका ?कधी पोहोचली परीक्षा केंद्रांवर? कधी फुटला पेपर? कोणाजवळ काय सापडले आणि आता काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी दिली आहेत. त्यांनी दिलेली जशीच्या तशी उत्तरे ईडीटीव्हीच्या वाचकांसाठी.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172