दिव्यांगावर मात करून झाल्या सी-इसरोच्या वैज्ञानिक;काय लागतात पात्रता? कायआहे चंद्रयान -3चा अनुभव-सौ.श्रद्धा गोयंका
जालना -ध्येय गाठण्यासाठी परिस्थिती आणि दिव्यांगपणा आडवा येत नाही, गरज असते ती फक्त आपल्या जिद्दीची. असे प्रतिपादन सी-इसरो अहमदाबाद येथील वैज्ञानिक सौ .श्रद्धा गोयंका अग्रवाल यांनी केले आहे. सौ श्रद्धा या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील आहेत लहानपणीच एका दुर्घटनेमुळे त्यांचा एक हात अधू आहे या दिव्यांगावर मात करत त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा दिल्या आणि आज त्या वैज्ञानिक म्हणून सी-इसरो अहमदाबाद येथे कार्यरत आहेत .जालना हे त्यांचे सासर आहे.edtv news च्या प्रतिनिधी सोबत बोलतांना त्यांनी इसरो मध्ये भरती होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता आणि परीक्षा याविषयी देखील सविस्तर माहिती दिली.
जे.ई. एस. महाविद्यालयात आयोजित “युवा संवाद” या कार्यक्रमांतर्गत” चंद्रयान- 3, एक उपलब्धी” या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्य डॉक्टर महावीर सदावर्ते ,प्रा. प्रवीण चंदनशिवे, डॉक्टर नानासाहेब गोरे, चित्रकार रवी कोका, सीए आकाश मकरिये, किशोर डांगे, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना चांद्रयान -3 या मोहिमे संदर्भात थोडक्यात माहिती देताना त्यांनी सांगितले की एखादी मोहीम यशस्वी करायची असेल तर आपली तुलना इतरांशी करू नका, म्हणजेच कोणत्या देशाने काय केले आहे हे न पाहता दोन मोहीम अयशस्वी ठरल्यानंतर दुसरी मोहीम ज्या दिवशी यशस्वी झाली त्याच दिवसापासून तिसऱ्या चांद्रयानाचे काम सुरू झाले आहे आणि ते आज यशस्वी झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जाताना एक -एक पाऊल टाकत चला. त्यामुळे आपला पाया भक्कम होईल आणि टप्प्याटप्प्याने ही चांद्रयान मोहीम अशाच पद्धतीने पुढे गेली आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपयशामुळे खचून जाऊ नका. विज्ञान कधीही चुकत नाही, त्यामुळे एखादी सफलता मिळवायची असेल तर ती अवघड नाही परंतु ती टिकवणे अवघड आहे असे मतही सौ श्रद्धा गोयंका यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी समयोचित मार्गदर्शन केले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172