Jalna Districtजालना जिल्हाराज्य

दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ पुस्तकाचे प्रकाशन !

छत्रपती संभाजीनगर- ‘दाभोलकरपानसरे हत्या तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक लेखक डॉअमित थढानी यांनी  १० हजार पानाच्या चार्जशीटचा अभ्यास करून तयार केले आहेया सर्व प्रकरणात न्यायालयात योग्य तो न्याय होईलच याची निश्चिती वाटतेया पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्या विषयाला त्यांनी वाचा फोडली आहेअसे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते तथा भारताचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉभागवत कराड यांनी केलेते छत्रपती संभाजीनगर येथील ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’ येथे झालेल्या डॉअमित थढानी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

        या पूर्वी डॉथढानी यांनी लिहिलेल्या ‘रॅशनालिस्ट मर्डर्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहेत्यानंतर त्यांनी डॉनरेंद्र दाभोलकर आणि कॉगोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर मराठी भाषेतील हे स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे.

      या वेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉकराडपुस्तकाचे लेखक तथा मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉअमित थढानी, ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ‘संकल्प हिंदुराष्ट्र अभियाना’चे कार्यवाह श्रीकमलेश कटारिया यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेया कार्यक्रमाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

      या प्रसंगी पुस्तकाचे लेखक डॉथढानी म्हणाले कीदाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल हे नंतर ‘सीबीआय’च्या कस्टडीमध्ये आले होतेअसे असतांना त्यांच्या कस्टडीतून ते बाहेर निघून कॉपानसरे हत्येमध्ये ते कसे काय वापरले जाते आणि पुन्हा कस्टडीत येऊन बसते हे सर्व षड्यंत्र आहेखर्‍या आरोपींना कोणी शोधलेलेच नाहीकेवळ एका हिंदुत्ववादी संघटनेला गोवण्याचे काम केले आहे.

     या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले कीपानसरेदाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे हा दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करतो१६ फेब्रुवारी २०१५ ला पानसरे यांची सकाळी हत्या झाली.  त्या वेळी सचिन अंदुरे सकाळी कोल्हापुरात होतापण तो ज्या दुकानात काम करतोतेथील रजिस्टरमध्ये तो अर्धा दिवस दुकानात नव्हताअशी नोंद आहेयाचा अर्थ सचिन अंदुरे संभाजीनगरवरून कोल्हापूरला गेलातेथे त्याने पानसरेंचा खून केला आणि पुन्हा तो दुपारपर्यंत संभाजीनगरला परत आलाहे कसे शक्य आहे प्रत्यक्षात जायलायायला किती वेळ लागेल या सर्वांची उत्तरे पोलिसांना द्यायची नाहीतहे पुस्तक म्हणजे एका सर्जनने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ आहे.

      या वेळी ‘संकल्प हिंदुराष्ट्र अभियाना’चे कार्यवाह श्रीकमलेश कटारिया म्हणाले कीआज देशातील विविध न्यायालयांत पाच कोटी खटले प्रलंबित आहेतअनेक खटल्यांतील हिंदुत्ववादी न्यायाची वाट बघत आहेमात्र दुर्दैवाने आज सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हिंदुत्ववाद्यांना छळले जात आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button