Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

श्री मत्स्योदरी देवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटी; 40 कोटींच्या विनियोगासाठी समिती होणार स्थापन

जालना- नवरात्रोत्सवाला उद्या रविवार दिनांक 15 पासून प्रारंभ होत आहे .जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी संस्थांच्या घटस्थापनेलाही प्रारंभ होत आहे .त्यानिमित्त मंदिर व्यवस्थापनाची तयारी पूर्ण झाली आहे. रंगरंगोटी, विद्युतीकरण, साफसफाई ,दुकानांचे हराशी, हे सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मंदिराला आणि परिसराला रंगरंगोटी केल्यामुळे देवीचे मंदिर खुलून दिसत आहे.

शासनाच्या वतीने संस्थानच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीचा विनियोग करण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती संस्थांचे व्यवस्थापक कैलास शिंदे यांनी दिली. यामध्ये संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार, बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे, छत्रपती संभाजीनगर येथील वास्तु विशारद प्रदीप देशपांडे, आणि स्थानिक सल्लागार मध्ये दादासाहेब थेटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंताच्या देखील समावेश आहे. या निधीमधून व्यावसायिक गाळे, लिफ्टच्या बाजूला सुमारे 30 फूट उंचीची महादेवाची मूर्ती, सौरऊर्जा, शौचालय, पोलीस चौकी संस्थांसाठी स्वतंत्र रोहित्र आदी विकास कामांचा समावेश आहे .

edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. दहावी पास साठी नवस करणारी कोणती महिला झाली IAS, कोण आहे नवसाची बायको? मैत्रिणीकडून उधार पैसे घेतल्यामुळे कोणी खाल्ले  रट्टे? कोण ढापत होतं आजी आजोबांकडून जत्रेसाठी पैसे? कुणाला आवडते गोड शेव?आणि बरंच कांही…पहा Edtv News वर

नवरात्र उत्सवा दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये योग्य मार्गदर्शन मिळावे त्यासाठी संस्थांचे सात कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 75 स्वयंसेवक,  मत्स्योदरी महाविद्यालयाचे 10 स्वयंसेवक ,पोलीस प्रशासन अशी यंत्रणा कार्यरत राहणार आहे. हे आहेत विशेष कार्यक्रम. अश्विन शुद्ध सप्तमी शनिवार दिनांक 21 यात्रेचा मुख्य दिवस ,सायंकाळी आरती नंतर अतिशबाजी. अश्विन शुद्ध अष्टमी रात्री बारा वाजता होम हवानाला सुरुवात. अश्विन शुद्ध नवमी सकाळी सहा वाजता पूर्णाहुती, ब्राह्मण संभावना. दररोज दुपारी बारा आणि सायंकाळी सात वाजता महाआरती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button