Advertisment
Jalna DistrictRanraginiजालना जिल्हाराज्य

बालपण हे रट्टे खाण्यासाठीच असतं आणि असायलाचं पाहिजे ,आयुष्याची शिदोरी मिळते, महिलांनो “या” दोन गोष्टी सोबत ठेवा- उपविभागीय कृषी अधिकारी सौ.शीतल चव्हाण

जालना(दिलीप पोहनेरकर) -सर्वच क्षेत्रात व्यवस्थापन करण्याची जादू फक्त महिलांकडेच आहे. त्यामुळे पुरुषांनी महिलांचं स्थान मान्य करावे, फक्त देवी म्हणूनच पाहू नये तसे पाहिले तर वाटेल की ती आपल्यापासून वेगळी आहे. सर्व नारीशक्तीलाच देवी म्हणून पहावं आणि तिचे वर्चस्व नाही तर तिची सोबत जाणावि आणि तिची किंमत  फक्त  नवरात्रात आणि महिला दिनाच्या दिवशी न देता नेहमीच द्यावी अशी अपेक्षा उपविभागीय कृषी अधिकारी सौ. शितल चव्हाण यांनी व्यक्त केली. Edtv News च्या नवरात्रोत्सव” रणरागिनी 2023″ मध्ये त्या दुसरे पुष्पगुंपताना बोलत होत्या. त्यासोबत बालपणीच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या की बालपण हे रट्टे खाण्यासाठीच असतं आणि ते असलचं पाहिजे कारण याच वयात आयुष्यभर जगायचं कसं ?याची शिदोरी मिळते.

सौ. शितल चव्हाण या सध्या आत्मा म्हणजेच, एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, ज्याला मराठी मध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा असेही म्हणतात. यामध्ये कार्यरत आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्या काम करतात. शेतकरी फक्त शेतीच करत नाही तर त्याला जोडधंदा म्हणजे पशुपालन, कोंबड्या ,चारा पीक, शेततळे, मधमाशापालन ,मत्स्य व्यवसाय ,असे जोडधंदे करतो. शेती आणि या जोडधंदाचे फायद्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्या मार्गदर्शन करतात .स्वतःच्या स्वभावाबद्दल त्या म्हणतात ” मी कडक स्वभावाची आहे ,खोटं चालत नाही. परंतु कर्मचाऱ्यांसोबत काम करत असताना सलोख्याचेही संबंध ठेवावे लागतात. त्यामुळे मी व्यक्तिगत वेगळी आहे आणि कार्यालयीन वेगळे आहे .स्वसंरक्षणाबद्दल जर म्हणाल तर बेसिक गोष्टी या महिलांनी आत्मसात करायलाच हव्यात. शांत असणं हे चांगलं आहे, परंतु वेळप्रसंगी रणरागिणी देखील व्हायला शिकलं पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून माझ्यावर आलेल्या अडचणीच्या वेळी मी शिकलेले कराटे मला कामाला आले.  आजही समाजामध्ये महिलांना मानाचे स्थान आहे .पूर्वीपेक्षा महिलांना पोषक वातावरण आहे .त्यामुळे महिलांनी शांत संयमी राहून वेळप्रसंगी रणरागिनी व्हावे, ते होण्यासाठी काही मूलभूत गोष्टी महिलांनी जाणून घ्याव्यात आणि अडचणीच्या प्रसंगी कामाला येणारी  सेफ्टी पिन आणि मिरचीची पूड जवळ बाळगा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे”

रणरागिनीच्या विचारांबद्दल त्यांना प्रतिक्रिया  द्या 9421911325बालपणी जत्रेमध्ये गेल्यानंतर अपुरे पडणारे पैसे आणि त्यामधून मैत्रिणींकडे वाढवलेली उधारी ही माहिती घरी कळाल्यानंतर रट्टे बसले आणि यापुढे आपली परिस्थिती पाहूनच व्यवहार केला पाहिजे, अर्थात “अंथरून पाहून पाय पसरावे” ही शिकवण मिळाली त्यामुळे बालपणी रट्टे बसायलाच पाहिजेत आणि त्यासाठीच बालपण असतं, असे मतही सौ .शीतल चव्हाण यांनी व्यक्त केले.

edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. दहावी पास साठी नवस करणारी कोणती महिला झाली IAS, कोण आहे नवसाची बायको? ….आणि बरंच कांही.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button