आई दुर्गे! जालनेकरांवरील पाणी संकट दूर कर- मनपा आयुक्त संतोष खांडेकर दुर्गा मातेच्या चरणी नतमस्तक
जालना -आई दुर्गे! यावर्षी पाऊस कमी झाला आहे आणि जालना शहरावर पाण्याचे संकट येण्याची शक्यता आहे. हे संकट दूर कर आणि जालन्यामध्ये सदैव प्रसन्न वातावरण ठेव. अशी प्रार्थना जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी दुर्गामातेच्या चरणी नतमस्तक होऊन केली आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी जालना शहराचे आराध्य दैवत असलेल्या दुर्गा मातेची सायंकाळची महाआरती श्री. खांडेकर यांच्या हस्ते झाली.
गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गादेवीची यात्रा बंद होती. दुर्गादेवी मंदिर हे पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या जागेत आहे त्यामुळे इथे यात्रा भरवण्यासाठी जागेचा जाहीर लिलाव केला जातो आणि मगच या ठिकाणी ही यात्रा भरते. परंतु काही वर्षापासून हे लिलावच न झाल्यामुळे यात्रा बंद होती. मागील अनेक वर्षांची कसर भरून काढण्यासाठी यावर्षी यात्रेकरू आणि भाविक दोघेही सज्ज झाले आहेत आणि उत्साहाच्या वातावरणात यात्रेला सुरुवात झाली आहे. आयुक्त खांडेकर यांच्या हस्ते रहाट पाळण्याचे उद्घाटन करून यात्रेची सुरुवात झाली. यावेळी शासकीय कंत्राटदार खुशाल सिंग ठाकूर ,वास्तु विशारद संजय चौधरी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रभू ठाकूर ,कमलकिशोर गिरासे आदींची उपस्थिती होती.
edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. दहावी पास साठी नवस करणारी कोणती महिला झाली IAS, कोण आहे नवसाची बायको? ….आणि बरंच कांही.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172