दोन पिस्टल, दोन मॅगझीनसह चार आरोपी जेरबंद
जालना -स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापे मारून चार आरोपींकडून दोन मॅक्झिन,दोन पिस्टल एक जिवंत कडतुस जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बदनापूर परिसरात सुभाष विनायक डोलारे, राहणार राजेवाडी हा फिरत असताना त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व एक जिवंत कडतुस सापडले, या पिस्टलच्या खरेदी बाबत माहिती विचारली असता त्याने त्याचा मित्र अमोल राजेंद्र देशमुख राहणार शेलगाव तालुका बदनापूर व सोनू संतोष जाधव राहणार नूतन वसाहत जालना यांची नावे सांगितली. त्यावरून या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी ही शस्त्रे विनायक डोलारे याला दिल्याचे कबूल केले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कृष्णा तंगे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणांमध्ये सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोस्ट ऑफिस जवळ गावठी पिस्टल कमरेला बांधून फिरत असलेल्या अनिल सुनील पाटोळे याला या शस्त्रासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर स्थानिक गुना शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या टीम मधील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ ,गोकुळसिंग कायटे, कृष्णा तंगे,आडेप,आदींनी ही कारवाई केली.