रणरागिणी;मामाच्या मुलाचा रुबाब पाहून मी पोलीस झाले! वर्दीची पॉवर इतर नोकरीत नाही- महिला पोलीस सौ.सुमित्रा अंभोरे
जालना – “पोलिसांच्या वर्दी एवढी पॉवर सामान्य नोकरीत नाही , घरी शैक्षणिक वातावरण असताना देखील मामाचा मुलगा मुंबई येथे पोलीस अधिकारी आहे आणि त्याचा रुबाब पाहून मी पोलिसात भरती झाले. आणि आज समाज सेवा करताना खूप समाधान मिळत आहे असा मनोदय सौ.सुमित्रा अंभोरे-कदम यांनी व्यक्त केला.Edtv News च्या नवरात्रोत्सव “रणरागिणी 2023” चे सहावे पुष्पगुंपताना सौ. सुमित्रा अंभोरे -कदम बोलत होत्या.
रणरागिणीला प्रतिकिया द्या- 77448 84818
घरामध्ये सर्वजण उच्चशिक्षित आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतांना त्यांचा डीएड ला नंबर लागलेला असूनही ते सोडून पोलीस मध्ये भरती होण्यासंदर्भात त्या सांगतात” पोलिसांसारखा रुबाब इतर कोणत्याच नोकरीत नाही, फक्त रुबाबच नाही तर समाजसेवा देखील याच नोकरीमध्ये करण्याची संधी मिळते. कोविडच्या काळात आपण केलेल्या कामाबद्दल मला अभिमान वाटतो ,कारण समाजसेवा करायला संधी मिळाली. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला, या आनंदामध्ये जेवढे समाधान मिळते तेवढे समाधान कुठेही मिळत नाही .काम करायचं वेळापत्रक ठरलेलं नाही, रात्री बे रात्री कुठेही , कधीही जावं लागतं हे माहीत असताना देखील आपण ही नोकरी स्वतःहून स्वीकारलेली आहे .याचा आनंदच आहे .समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक असला तरी आम्ही मात्र संयम ठेवून हा दृष्टिकोन बदलतो” असेही त्या म्हणाल्या.
लहानपणाच्या गमतीजमती सांगताना त्यांनी सांगितले की,” बदनापूर तालुक्यात असलेल्या सोमठाणा येथील देवीला आम्ही पायी जात असत ,जत्रेत खर्च करण्यासाठी घरच्यांकडून पैसेही घेतले जायचे परंतु त्यापैकी थोडेच पैसे खर्च करायचे आणि उरलेले पैसे शाळेत आल्यावर लब्दुल( वाळलेली बोरे शिजवून गाड्यावर खाण्यासाठी मिळणारा पदार्थ) खाण्यात घालवायचे.”2012 मध्ये पोलीस प्रशासनात भरती झाल्यानंतर आत्तापर्यंत दामिनी पथकासह इतर विभागातही काम केले आहे, त्यामुळे तपासाचा अनुभव आणि बारकावे लक्षात आले .सध्या पिंक पथकामध्ये त्या कार्यरत आहेत. पिंक पथक म्हणजे ज्या प्रकरणांचा तपास महिलांच्या मदतीने केला जातो. अशा प्रकारचे एक पथक ज्याचा तपास सौ .अंभोरे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करतात .तपास करत असताना डोकं शांत पाहिजे त्यामुळे ताण-तणावाच्या वेळी भटकंती करून तो कमी केला जातो. त्यासोबत मैदानी खेळांची आवड असल्यामुळे त्या एक चांगल्या कबड्डीपटू देखील आहेत .कबड्डीच का ?या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की गावाकडे असताना मैदानी खेळांची आवड लागली या मैदानी खेळांमुळे शरीर सुदृढ राहते, याचाच एक भाग म्हणून आजही व्यायाम शाळेमध्ये जाऊन त्या व्यायाम करतात. या व्यायामामुळे असलेल्या सुदृढ शरीराचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो असे त्यांचे मत आहे .
edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. सुरू झाली आहे .रुबाब दाखविण्यासाठी कोण झाली पोलीस,कोणाला आवडते लाल गोड सेव,कोणती युवती झाली कीर्तनकार,…बरंच कांही.
दरम्यान नवीन पिढीला सल्ला देताना सौ. अंभोरे म्हणाल्या की, मुलींनी करिअर निवडताना कोण काय सांगेल याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय व्हायचे आहे ,आपल्याला कशात आवड आहे, यावर भर देऊन त्याच क्षेत्रात गेलं पाहिजे. तसेच दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी शरीर देखील सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यावरही भर द्यावा. रणरागिनी चा अवतार हा कधीतरी दाखवावाच लागतो ,कारण पोलीस प्रशासनात काम करत असताना सर्वच गोष्टी या प्रेमाने होत नाहीत, त्यामुळे आरोपींकडून गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी सुंदरीचा( सुंदरी हे पोलीस आरोपींना मार देण्यासाठी वापरतात .गिरणीच्या पट्ट्यासारखा हातभर जाड पट्टा असतो आणि त्याला पाठीमागच्या बाजूने लाकडाची मूठ लावलेली असते. ही मूठ हातात धरून पोलीस आरोपींना फटकेदेतात) वापर करावाच लागतो.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172