1.
Jalna DistrictRanraginiजालना जिल्हा

रणरागिणी; शालेय शिक्षणाला अध्यात्माचीजोड द्यावी-ह.भ.प.कोमल तेलगड

जालना- शालेय शिक्षणाला अध्यात्माची जोड द्यावी जेणेकरून अध्यात्माची अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या विकासाच्या वाटेमध्ये बाधा येणार नाही असे मत ह.भ.प. कोमल तेलगड यांनी व्यक्त केले आहे.Edtv News नवरात्रोत्सव च्या “रणरागिणी 2023”  उपक्रमात सातवे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या.

रणरागिणीला प्रतिकिया द्या+91 98500 21977

वर्ग सातवी मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच महिला कीर्तनकाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोमल ही अध्यात्माकडे वळाली. जालना तालुक्यातील रेवगाव येथे असलेल्या, श्री संत प्रेमानंद बाबा अध्यात्मिक शिक्षण संस्थेमध्ये सन 2018 मध्ये विविध उपक्रम चालत होते. हळूहळू या उपक्रमांचा प्रभाव कोमलच्या जीवनावर पडला आणि या संस्थेचे संचालक ह.भ.प. विष्णू महाराज बारड यांनी मुलींना देखील अध्यात्माचे शिक्षण देण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने या संस्थेमध्ये कोमल यांचे अध्यात्माविषयी शिक्षण सुरू झाले. सध्या बारावी मध्ये शिक्षण घेत असलेली कोमल दुसरीकडे हरिभक्त परायण म्हणून देखील परिचित आहे. अध्यात्मातील “विचार तरंग” हा अभ्यासक्रम सध्या सुरू आहे .नवरात्रोत्सवाच्या संकल्पनेबद्दल त्या म्हणतात” नवरात्र उत्सवा दरम्यान महिला, युवती  या नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतात ही चांगली बाब आहे. नवविध भक्तीचा रंगाचे ते प्रतीक आहे. महिलांनी केवळ नऊ दिवसांपूर्तीच उपासना न करता बाराही महिने उपासना करावी, नऊ रंगापैकी एक तरी रंग ज्या ज्या भक्तीचा तो रंग प्रतीक आहे तो प्रत्यक्षात अमलात आणावा आणि तो जर आणला तर नारी मध्ये असलेली शक्ती जागृत होईल ,किंबहुना नारी च्या पाठीमागे एक अदृश्य शक्ती  उभी राहील. त्यासाठी फक्त भक्ती करून चालणार  नाही तर त्याला प्रत्यक्षामध्ये असलेल्या विज्ञानाची देखील जोड दिली पाहिजे. शालेय शिक्षण घेत असताना विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली तर महिलांच्या विकासात कोणतीही बाधा येणार नाही असेही त्या म्हणाल्या.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button