Advertisment
Jalna DistrictRanraginiजालना जिल्हा

आंध्र आणि तेलंगणाची “बदकम्मा आणि कोकलु” परंपरा जालन्यात

जालना- हिंदूंच्या प्रत्येक सणाची काहीतरी वेगळी परंपरा आहे, वेगळ्या प्रदेशात ती वेगळ्या नावाने ओळखली जाते एवढेच! महाराष्ट्रात ज्याप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दांडिया, गोंधळ, जागरण,सोंगट्या, असे खेळ खेळले जातात तशाच पद्धतीचे खेळ आंध्र आणि तेलंगाना राज्यातही खेळले जातात. जालना शहरात आंध्र प्रदेशातील पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात आहे .महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी त्यांची देखील परंपरा आहे .

पद्मशाली समाजाच्या महिला मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहात हा सण साजरा करतात .त्यांच्याकडे देखील महाराष्ट्रातील परंपरेप्रमाणे दांडिया खेळला जातो, परंतु त्यामध्ये टिपऱ्या नसतात  एवढाच काय तो फरक.या नवरात्राच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये पाच दिवस हा खेळ खेळला जातो कसा खेळतात ? कशाला म्हणतात” बदकम्मा आणि कोकलू” हे मी सांगितल्यापेक्षा व्हिडिओमध्ये पाहिल्याने लवकर लक्षात येईल. अत्यंत सुंदर आणि तालबद्ध पद्धतीने आंध्र आणि तेलंगणा राज्यातील जालन्यात वास्तव्यास असलेल्या महिलांनी हा खेळ खेळला आहे. समृद्धी पद्मशाली महिला संघमच्या, महिलांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. जालना शहरातील रामनगर परिसरात असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये हा खेळ रविवारी खेळला गेला.

ही परंपरा जपण्यासाठी पद्मशाली महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ. सुप्रिया चलमेटी, सौ. मीरा पोलास,सौ. वर्षा दुर्गम, सौ. पल्लवी वंगर ,सौ.ईश्वरी दुर्गम,सौ. भारती चलमेटी, सौ.सोनाली दासार ,सौ.ज्योती वंगर यांनी पुढाकार घेतला .

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button