उर्मी तर्फे कोजागिरी निमित्त ” दुधात सांडले चांदणे”!
जालना -मराठी कवितेच्या संवर्धन आणि समृद्धीसाठी मागील अडीच दशकांपासून “ऊर्मी ही संस्था कार्यरत आहे . उर्मी ट्रस्टच्या वतीने यंदा रौप्य महोत्सवी वर्ष परिपूर्ती निमित्त कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ्र पिठोरी चांदण्यात शनिवारी ( ता.28) सायं.06.00 वा.टाऊन हॉल स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात “दुधात सांडले चांदणे” हा काव्यउत्सव, उर्मी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण आणि विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रा.जयराम खेडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ज्येष्ठ कविवर्य फ.मु. शिंदे, आ.कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. रामलाल अग्रवाल आणि वैद्यकीय क्षेत्रातील सुवर्णपदक प्राप्त युवा कवयित्री डॉ.प्रिती कैलास देशमुख ( मिरज,जि.सांगली) यांचा विशेष सन्मान केला जाणार असून यावेळी ज्ञानेश्वर भांदरगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील.
संपादक प्रा.जयराम खेडेकर, कार्यकारी संपादीका कविता बोरगावकर यांनी संपादित केलेल्या उर्मीच्या रौप्यमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर कविवर्य इंदर बोराडे (पाटोदा), कवयित्री प्रतिभा सराफ (मुंबई), सुरभी पाटील ( पुणे), कविता बोरगावकर (माजलगाव) या शब्दवेड्या कलावंतांची धुंद काव्य मैफिल रंगणार असून मस्त फकीर फ.मु. शिंदे आणि प्रा . जयराम खेडेकर यांच्या बहारदार सूत्रसंचालनाचे विशेष आकर्षण राहील. तरी काव्य रसिकांनी मोठ्या संख्येने सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा.जयराम खेडेकर आणि उर्मी च्या वतीने करण्यात आले आहे.——
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
–9422219172