1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

कोण आहेत ते झारीतील शुक्राचार्य? ज्यांनी आमचं…आ.राजेश टोपे

जालना. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्याचे पालन त्वरित केले नाही तर आपण 24 तासांमध्ये न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिकात दाखल करू असा इशारा माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज दिला.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सन 2014 मध्ये समन्यायी पाणी वाटपाचा कायदा केला होता त्यानुसार जायकवाडी धरणामध्ये 65 टक्के पाणी राहील असे नियोजित होते परंतु जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे आणि सध्या 45%च पाणीसाठा आहे त्यानुसार 15 ऑक्टोबरलाच पाणी सोडण्यासंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने धरणाच्या अधिकाऱ्यांना आदेश देणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर 27 ऑक्टोबरला 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश काढल्या गेले. यापैकी 5.6 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात आले असते परंतु, नऊ दिवस झाले आदेश निघूनही अद्याप पर्यंत हे पाणी आलेले नाही .या पाण्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, मराठवाड्यातील या तीन मोठ्या जिल्ह्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो. असे असतानाही या अधिकाऱ्यांनी या झारीतील शुक्राचार्यांनी कोणाच्या आदेशान्वये कागदी घोडे नाचवले आहेत? आणि पाणी सोडले नाही .अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा कायदा मोडला याबाबत न्यायालयात अवमान याचिका दाखल करू असा गर्भित इशारा देखील माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी दिला आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button