1.
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

त्या”खास कॉफी” सेंटरचा दर; केबिन साठी 250 तर सोफासेठ साठी 500; पोलिसांचा छापा

जालना- सर्वसामान्यांना जर कॉफी प्यायची असेल तर एखादा सेंटरमध्ये गेल्यानंतर फार झाले तर पन्नास रुपये एका कपाचे मोजावे लागतात, परंतु जालना शहरात चक्क केबिनमध्ये कॉफी प्यायची असेल तर अडीचशे रुपये आणि सोफ्यावर बसून प्यायची असेल तर पाचशे रुपये चार्ज घेणारं मंठा चौफुलीवर “कॅफे फूट ट्रेझर” या नावाचं कॉफी सेंटर आहे आणि या सेंटरवर सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी छापा मारून अशी “महागडी कॉफी” पिणारे तीन जोडपे पकडले आहेत. परंतु हे तिघेही महाविद्यालयीन असल्यामुळे त्यांच्या भवितव्याचा विचार करून समज देऊन सोडून देण्यात आले आहे. आता समजलेच असेल की हा एवढा दर इथे कसा?

तीन महिन्यांपूर्वी जालना शहरातील मध्यवस्तीत म्हणजेच आझाद मैदान परिसरात चालत असलेल्या कॉफी सेंटरवर छापा मारून सदर बाजार पोलिसांनी इथे चालणारे अश्लील चाळे उध्वस्त केले होते, त्यानंतर आता पुन्हा मंठा चौफुली परिसरात सुरू असलेल्या “कॅफे फूड ट्रेझर “इथे आज छापा मारला. पोलिसांना माहिती मिळाली होती की, या कॉफी सेंटरमध्ये वेगवेगळे दर आकारून तरुण-तरुणींसाठी विशिष्ट प्रकारची जागा उपलब्ध करून दिला जाते .ज्यामध्ये त्यांना बेड म्हणजेच झोपण्यासारखी खोली ही उपलब्ध केला जाते, या माहितीची खात्री केल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दिपाली शिंदे ,महिला पोलीस कर्मचारी कल्पना बोडके, पोलीस अंमलदार भरत ढाकणे आणि पोलिस अंमलदार प्रतीक करतारे यांनी याचे नियोजन केले, आणि आज  दुपारी छापा मारला .त्यावेळी या सेंटरमध्ये वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये बसून महाविद्यालयीन मुले- मुली अश्लील चाळे करत असताना पोलिसांनी पकडले आहे. दरम्यान काउंटर वर काम करत असलेला कर्मचारी सुमित कैलास केसापुरे वय 29 वर्षे, राहणार भावसार गल्ली,जालना याच्याकडे माहिती विचारली असता येणाऱ्या तरुण-तरुणी बद्दल कोणतीही माहिती तो देऊ शकला नाही. दरम्यान पोलिसांनी इथे पकडलेल्या तीन तरुण जोडप्यांना त्यांच्या भविष्याचा विचार करून समज देऊन सोडून दिले आहे. या ठिकाणी पाच वेगवेगळे कंपार्टमेंट आढळून आले आहेत एका बाजूला पाच फूट रुंद आणि सात फूट लांबीची रूम त्याला एक सरकता दरवाजा होता त्या रूम ची माहिती पोलिसांनी एक बनावट जोडपे पाठवले आणि या जोडप्याला दिलेली बनावट नोट कॅफे सेंटरच्या काउंटर मध्ये सापडल्यामुळे इथे चालत असलेल्या या अश्लील कामांची यांची खात्री पटली .एका तासासाठी या ठिकाणी ही रूम उपलब्ध करून दिला जात होती.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button