हभप भगवान बाबांच्या हस्ते उद्या श्री संत संताजी अर्बन सोसायटीचे उद्घाटन
जालना व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या जालना शहरांमध्ये आणखी एका वित्तीय संस्थेची भर पडत आहे मंगळवार दिनांक 14 रोजी श्री संत संताजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या वित्तीय संस्थेचा ह. भ. प. भगवानबाबा आनंदगडकर यांच्या हस्ते कादराबाद भागात असलेल्या मिसळ टॉवर येथे सकाळी नऊ वाजता हे उद्घाटन होणार आहे .
विविध टप्प्यांमध्ये चार टक्क्यांपासून 9% पर्यंत मुदत ठेव योजनेवर व्याज मिळणार आहे तसेच कर्जासाठी 12% ते 18% असेही व्याज आकारले जाणार आहे. इतर वित्तीय संस्था प्रमाणेच इथे देखील सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या उद्घाटनाचे औचित्य साधून दीपावली स्नेहमेलनाचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या दोन्ही कार्यक्रमांना जालनेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री संत संताजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक पांगरकर उपाध्यक्ष विश्वनाथ शिरसागर सचिव मोहन अबोले यांच्यासह संचालक जनार्दन व्यवहारे भानुदास मिसाळ गणेश धारकर रामचंद्र चौधरी कैलास सोनुने विनोद शिनगारे कैलास पिंपळे विनोद भोजराज वासुदेव देवडे डॉ प्रदीप पंडित आणि तज्ञ संचालक शिरीष देवळे यांनी केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172