बुधवारपासून “अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा” ;महिला व युवतींसाठी सामने पाहण्याची विशेष व्यवस्था
जालना-मेंटरोल्स इस्पात प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्रेंड्स फुटबॉल क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जालना शहरातील आझाद मैदानावर “अखिल भारतीय आमंत्रित फुटबॉल स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 22 रोजी सकाळी आठ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आ. कैलास गोरंट्याल तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, मेटारोल्सचे संचालक डीबी सोनी ,आशिष भाला, तसेच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजीराजे भोसले ,सुनील धांडे आणि सचिव किरण चौगुले यांची उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती फुटबॉल संयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिली.
फ्रेंड्स फुटबॉल क्लब च्या वतीने आतापर्यंत मराठवाडा व राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. आता पहिल्यांदाच अखिल भारतीय आमंत्रित फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेचे पहिले बक्षीस दोन लाख 11 हजार एकशे अकरा रुपये आणि दुसरे बक्षीस एक लाख 50 हजार रुपये इतके आहे . खेळाडूंसाठी विविध प्रकारची इतरही बक्षीसे जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील 10 संघ आणि गुजरात ,दिल्ली, मध्य प्रदेश, तामिळनाडू, बेंगलोर, हैदराबाद असे महाराष्ट्र बाहेरील अशा एकूण 16 संघांमध्ये हे सामने होणार आहेत. जालना शहरातील क्रीडा प्रेमींसाठी हे सामने एक पर्वणीच ठरणार आहे. ज्या महिला व युवतींना फुटबॉलची आवड आहे अशा प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था संयोजन समितीने केली आहे .आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यासाठी फ्रेंड्स फुटबॉल क्लबचे अध्यक्ष कन्हैयालाल भुरेवाल, मिर्झा अनवर बेग, किशोर जाधव, सचिन जयस्वाल, रमेश शेळके, आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172