Jalna Districtराज्य

बाजार समिती समोर बस -कंटेनर चा अपघात; 15 प्रवासी जखमी; एसटी महामंडळाची तातडीची मदत

जालना -आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबड- अकोला या बसचा आणि कन्हैया नगर कडून संभाजीनगर कडे जाणाऱ्या कंटेनरचा बाजार समितीच्या समोर अपघात झाला. या अपघातामध्ये 15 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

बस क्रमांक एम एच 20 बी एल 17 80 ही जालना स्थानकातून निघाल्यानंतर बाजार समिती कन्हैया नगर चौफुली मार्गे अकोल्याकडे रवाना होत होती. याच दरम्यान कन्हैया नगर कडून संभाजीनगर कडे जाणारा कंटेनर क्रमांक एच आर 38 ए डी 87 82 ही दोन्ही वाहने एक दुसऱ्याला घासली. यामध्ये बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे चालक भीमराव पांडुरंग गांगे आणि वाहक रामेश्वर गोरख वाघ हे दोघेही घटनास्थळावर पुढील पंचनामासाठी ठाण मांडून आहेत.

दरम्यान बसमधील जखमी प्रवाशांना सामान्य रुग्णालयात भरती केले केले आहे , त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .या अपघाताची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे अधिकारी वाहतूक नियंत्रक पी.एफ. इंगळे आणि वाहतूक निरीक्षक सुहास सोने यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि सामान्य रुग्णालयात येऊन जखमी प्रवाशांना तातडीची मदत म्हणून रोख एक हजार रुपये दिले आहेत. जखमी प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे- वर्षा ठोंबरे अनिल ठोंबरे राहणार पांगारकर नगर जालना ,अल्पेश कोकरे आर्या कोकरे राहणार गणेशपुर ,चित्रगंधा थोरात खामगाव, अरुण कोळपे ,राजेंद्र धुरधर राहणार खामगाव ,आशा विश्वनाथ भालेराव टेंभुर्णी, अश्विनी गवळी राजुर ,नंदाबाई बबनराव पैठणकर राहणार ढवळेश्वर जालना ,शोभा अरुण कोळपे राहणार हिवरखेडा तालुका खामगाव आदींची नावे आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button