धनगर समाजाच्या मोर्चाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक; जिल्हाधिकाऱ्यांचे वाहने फोडले
जालना- धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी आज गांधी चमन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. दुपारी एक वाजता गांधी चमन इथून निघालेला मोर्चा दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला तिथे या मोर्चाचे सभेमध्ये रुपांतर झाले आणि अनेकांची भाषणे झाली .
या भाषणानंतर उपस्थित मोर्चेकरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी खाली यावे आणि निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या बैठका सुरू असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांना निवेदन घेण्यासाठी पाठवले मात्र मोर्चेकरे आणि पोलिसांनी त्यांना परत पाठवत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांनीच निवेदन स्वीकारावा असा मोर्चे कराचा आग्रह असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके आणि उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ यांना पाठवले .तोपर्यंत सर्व मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमा झाले होते. या अधिकाऱ्यांना पाहून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडले आणि परिसरामध्ये प्रवेश केला .फक्त प्रवेशेच नाही केला तर इमारतीच्या काचाही फोडल्या. इथे असलेल्या झाडांची मोडतोड ,कर्मचाऱ्यांच्या असलेल्या दुचाकींची ही तोडफोड करून केली आणि दगडफेक करून जिल्हाधिकाऱ्यांची गाडीही फोडली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172