Jalna Districtजालना जिल्हाराज्य

26/ 11 च्या थरार ला उजाळा ; तुकाराम ओंबळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा- प्रशांत महाजन

जालना-26 11 ही तारीख म्हटले की अंगावर काटा येतो कारण याच दिवशी पाकिस्तानातील 10 दहशतवाद्यांनी मुंबई येथे हल्ला केला होता यामध्ये सुमारे 800 नागरिक गंभीर जखमी झाले होते, त्यामध्ये 34 परदेशी पाहुण्यांचाही समावेश होता तर 14 पोलीस अधिकारी कर्मचारी शहीद झाले होते, तसेच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी देखील गंभीर जखमी  झाले होते, अशा या मुंबईच्या हल्ल्याचा थरार हा शब्दात सांगण्यासारखा नाही, अशा भावना पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी व्यक्त केल्या आहेत. हा हल्ला झाला त्यावेळी प्रशांत महाजन हे मुंबई शहर पोलीस दलातच कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी या हल्ल्याच्या पश्चात जे मदत कार्य आणि पोलीस कारवाया झाल्या त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी 26/ 11 या दिवशी पोलीस प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर  Edtv News ने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये श्री. महाजन बोलत होते.

हल्ला कसा झाला? त्यानंतर काय परिस्थिती उद्भवली? आणि कशी हाताळली तो अनुभव शब्दात सांगता येत नाही आणि व्यक्तही करता येत नाही. या हल्ल्यामुळे रक्ताचा मोठा तुटवडा भासला होता. तशीच परिस्थिती तीन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या कोविड महामारीमुळे देखील निर्माण झाली होती. या दोन्ही परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी म्हणून रक्त संकलन करण्याचे ठरवले होते. याच निमित्ताने शहिदांच्या बलिदानालाही उजाळा मिळतो. त्यामुळे 26/ 11 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात येते.  यावर्षीचे हे चौथे वर्ष असल्याचेही ते म्हणाले .

गुंड आणि पोलीस हे दोघे एक दुसऱ्याला भितात अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गुंडांची भीती वाटत नाही का ?या प्रश्नाला उत्तर देताना श्री. महाजन म्हणाले, 26/ 11 च्या हल्ल्यांमध्ये तुकाराम ओंबळे  या पोलीस कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य बजावताना कोणतीही भावना न जोपासता आपल्या प्राणांची आहुती दिली आणि अजमल कसाबला पकडले. त्यामुळे गुंडांना भिण्याचा विषयच नाही. जोपर्यंत तुकारामओंबळे  यांचा आदर्श महाराष्ट्र पोलिसांसमोर आहे किंवा त्यापैकी थोडा जरी आदर्श पोलिसांनी घेतला तर गुंड समाजाला त्रास देणार नाहीत हे निश्चित आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात येत असलेल्या नवीन कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेने कार्य करावे अशी अपेक्षाही पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी व्यक्त केली. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबिरात नागरिकांनी रक्तदान करून शहिदांच्या स्मृतीला उजाळा द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button