Jalna Districtजालना जिल्हाराज्य

पुरुष बंदीगृह पाहून दादांना काय वाटले…?

जालना -26 /11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये अनेक जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि संविधान दिनाचे औचित्य साधून सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराची पाहणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकाळी आठ वाजताच केली. फक्त रक्तदान शिबिराची पाहणी न करता जुनाट झालेल्या या पोलीस ठाण्याच्या इमारतीचीही त्यांनी पाहणी केली. विशेष करून ज्या ठिकाणी कैदी ठेवले जातात त्या बंदी गृहाची देखील त्यांनी पाहणी केली.

खासदार दानवे हे विद्यार्थी दशेपासूनच चळवळीतील कार्यकर्ते .त्यामुळे कधी ना कधीतरी पोलीस ठाण्याशी संपर्क येतच होता. त्यानंतर ते राजकारणात आले आणि पोलीस ठाण्यांशी थेट संपर्क तुटला. परंतु आज या रक्तदान शिबिराच्या निमित्याने पोलीस ठाण्यात आल्यानंतर बंदीगृहांची पहाणी करत असताना पुरुष बंदीग्रासमोर आल्यानंतर त्यांना काहीतरी जाणवले आणि आजही तशीच परिस्थिती आहे का? असे आपसूकच बोलून गेले .त्यामुळे कदाचित विद्यार्थी दशेमध्ये त्यांचा या पोलीस ठाण्याशी काहीतरी संपर्क आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान संपूर्ण पोलीस ठाण्याची पाहणी केल्यानंतर ठाण्याची असलेली जुनी इमारत आणि पोलीस प्रशासनावर वाढणारा ताण पाहता इथे नवीन इमारत असणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त करत ठाण्यासाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवा आपण शासन दरबारी त्याला मंजुरी घेऊ अशा सूचना त्यांनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन यांना दिल्या .

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button